खूप मोठा हॉल गजबजून गेला होता.आज तिच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. स्टेजवर निमंत्रितांमधे ती बसली होती . राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार तिला आज मिळाला होता.अशा आणखी ब-याच पुरस्कारांची ती मानकरी ठरली होती.सत्कार झाला सन्मानचिन्ह हातात घेताना तिच्या डोळ्यातून अलगद दोन अश्रू त्या सन्मानचिन्हावर ओघळले . या साहित्य प्रवासास सुरुवात केली त्या क्षणापासूनचा प्रवास तिच्या डोळ्यासमोर तरळत राहिला.