अस्मिता एक गरीब मुलगी. दुर्दैवाने वडील नाहीत.हातावरचे पोट.आई कष्टाळू.ती आजारी पडते म्हणून ती आईची कामे करते. शांताबाई तिला राबवून घेऊन , सारखे टोमणे मारत असतात.तिला कधीकधी हे खूपच असह्य होते.ह्या चक्रव्यूहातून बाहेर पडायचे असे ती ठरवते.आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर लढा द्यायला पाहिजे
मीनाकाकू शिक्षिका असतात.त्या तिला शिक्षण देतात.एकदा शांताबाई मोहनमाळ चोरल्याचा आरोप करतात.मग तिची सहनशक्ती संपते.पोलिसांना सर्व साःगते.मोहनमाळ घरातच सापडते.शांताबाईंना पश्चात्ताप होतो.तेवढ्यात मीनाकाकू बारावीत 85% मार्क्स मिळाल्याची आनंदाची बातमी देतात.तिला मुख्याध्यापिका शाळेत पार्ट टाईम नोकरी देतात.अशा रितीने ती लढा देऊन ह्या चक्रव्यूहातून सुटका करुन घेते.आपले स्वातंत्र्य झगडून मिळवते. अशी ही अस्मिताची तेजस्वी , ओजस्वी कथा!!