डाॅ.संतोष सेलूकर जि.प.परभणी मध्ये शिक्षक वाचन लेखन हे छंद दुरचे गाव हा कविता संग्रह प्रकाशित विविध वृत्तपत्रातून काव्यलेखन,लतिलेखन प्रसिद्ध
Book Summary
ज्योती आणि मकरंद यांच्या उत्तम पाहुणचारामुळे दत्तागुरु जेवढ्या तावातावाने त्यांना भांडायला आणि खडे बोल सुनवायला आले ते सगळंच विसरुन गेले अन् तृप्ततेची ढेकर देऊन भांडण करायचे विसरुन पोटावरुन हात फिरवत ‘खीर छान झाली होती गं ज्योती !’ असं म्हणत जायला निघाले. ‘येतो रे मकरंद’असं म्हणत भरभर चालत निघाले.जातांना आख्या वैष्णव गल्लीतल्या दारे-खिडक्या,गॅलरी,गच्चीवरुन सगळेजण वाकून पाहत होते.पण सार्वांचाच आपेक्षाभंग झालेला दिसत होता.भांडायला आलेल्या गुरुकडून त्यांचा राग विसरुन ब्राह्मण भोजनाचे पुण्यकर्म मिळवणे हे तर तेनालीरामापेक्षाही भारी काम म्हणावे लागेल.धन्य ते मकरंद आणि ज्योती पांडे असंच सगळी मंडळी म्हणत असावी
गुरु गेल्यावर गोल्याही खाली पळत आला आणि आपल्या आई पप्पाकडे पाहून गालातल्या गालात हसू लागला.सर्वंच एकमेकांकडे पाहून संकटातून सुटलो असं म्हणत हसू लागले.
गोल्या म्हणाला,“सॉरी, मम्मा, पप्पा,तुम्ही आज मला गोड बोलण्यामुळे कसा प्रश्न सुटतो.कितीही भयंकर रागाला प्रेमाने कसे जिंकता येते, हे दाखवून दिले.सो थँक्यू मी ही माझ्या जीवनात या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करीन”