दिवाळी म्हटलं की रंगरंगोटी, साफसफाई, खरेदी, फराळ या सगळ्यांसोबत समस्त स्त्री वर्गाला आठवण येते ती माहेराची.
युगानुयुगांपासून माता, भगिनींना दिवाळीला माहेरी जाण्याची ओढ असते. मात्र काळ बदलला, स्त्री नोकरीला लागली, आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी झाली, माहेरपणासाठी सलग सुट्ट्या मिळणे शक्य नव्हते मग हे माहेरपण चार-पाच दिवसांवरून अगदी एका दिवसावर, काही तासांवर आले.