भारती महाजन रायबागकर - (05 July 2025)खूप छान... स्वतःची इच्छा बाजूला ठेवून मदत करणं... छान संस्कार
11
REKHA THAKARE - (25 May 2025)खुपच सुंदर कथा आहे...
उन्हाळ्याची चाहूल लागताच आपल्याला आठवते ती आइस्क्रीम. मग ती एखाद्या मैत्रिणीबरोबर खाल्लेली असेल किंवा कुटुंबाबरोबर खाल्लेली असेल. अगदी आरामात बसून इकडच्या तिकडच्या गप्पा मारता मारता केव्हा संपते कळतही नाही. पण प्रस्तुत कथेतील गोट्या नावाचा लहान मुलगा एका गारीगारसाठी दिवसभर कष्ट करतो. गारीगारवाल्याची सायकल लोटतो. हे करत असताना तो आपल्या आई वडिलांकडे कधीही पैसे मागत नाही. हे पाहण्यासारखे आहे. ही कथा प्रेरणादायी आहे. वाचकांनी जरूर वाचावी.