भारती महाजन रायबागकर - (01 June 2025)खूप सुंदर... एकदम वेगळी कथा... खरोखरच गावोगाव एखादी अशी नर्मदा तयार व्हायला हवी कारण हा रानमेवा आता फार दुर्लभ झाला आहे. त्याची परदेशी लोकांकडून ख्याती आपल्याला ऐकायला मिळाली तरच त्याचं महत्त्व कळेल. गणेशचं नर्मदेवरचे प्रेम आणि नर्मदेचं गावकऱ्यांवरचं प्रेम आणि आस्था... आणि गणेशने ते समजून सहज स्वीकारणं... खूप छान वाटलं.
00
ज्योती अलोणे - (31 May 2025)रानमेवा म्हणून असलेल्या बऱ्याचशा नवीन वनस्पतींची, नाव कळाली. रानफुलांची नावं कळाली. नर्मदाने डॉक्टर बनून गावाची सेवा करायच ठरवलं आणि रानमेव्याचं उत्पादन वाढवून गावातल्या लोकांना कामधंदा मिळवून दिला उत्पादन परदेशी आयात करायचा ठरवलं .खूप स्तुत्य उपक्रम त्यांनी राबवायला घेतले आहे. समाजसेवा करावी तर अशी. पण या दोघांमध्ये नर्मदा आणि गणेश यांचं हळुवार गुंफलेलं भावनिक नातं.. पण ते नातं आपल्या मातृभूमीशी इमान राखणाऱी नर्मदा त्या हळूवार नात्याला मनातल्या कोंदनात जपून ठेवते.. गणेश परत जातो. अतिशय सुंदर कथा.