ही गोष्ट आहे संकेतची – एका मध्यमवर्गीय तरुणाची, जो आपल्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमध्ये रमलेला आहे. आयुष्य धावपळीचं आहे, पण त्यातही प्रेम आणि आपुलकी आहे. एक दिवस अचानक वडिलांची प्रकृती खालावते आणि सगळं आयुष्य क्षणात उलथून जातं. हॉस्पिटलच्या गर्दीत, अस्वस्थतेत, सैरभैर मनात – एक अनोळखी पण माणुसकीने भरलेली व्यक्ती, सुधा मावशी, हात पुढे करते. कोणतंही नातं नसताना, केवळ एका माणूस म्हणून ती दिलासा देते, आधार बनते.
त्या एका दिवसात संकेत देवाला शोधणं थांबवतो… कारण देव त्याला सापडतो – माणसात.