Aruna Mulherkar - (26 June 2025)कथानक नक्कीच चांगले आहे.बोधप्रद असून सकारात्मक आहे. एकच सांगावेसे वाटते की कोणताही साहित्यप्रकार लिहिताना भाषाशुद्धी व व्याकरण सांभाळणे अत्यावश्यक आहे. कथा वाचताना लक्षात येते की लेखकाने काळ सांभाळलेला नाही. एकदा भूतकाळ तर एकदा वर्तमान असा बदल दिसतो. याकडे लक्ष दिले तर कथा वाचायला अधिक चांगले वाटेल.
कथा एका स्वभिमानी गायीकेची आहे.पुरूषप्रधान संस्कृतीची बळी ठरता ठरता ती कौशल्याने तिच्यावरील गायनबंदीतून यशस्वीरित्या मार्ग काढते व एक अपराजिता स्त्री म्हणून उभी राहते.तिचा नवरा विकास तबलावादन शिकतो व दोघे एकत्र संगीतातील करतात व रसिक दोघांचे भरभरून अभिनंदन करतात व विभा चे गायन कायम राहते.