परिमळ हा खरे तर आजीबाईचा बटवाच ...!
रुप देखणे सुंदर
मन बागडते अवखळ
चहू दिशेला हिरवळ
हृदयी दरवळला परिमळ ...
कवयित्री सौ.प्रतिभा विभूते यांच्या ' परिमळ या कविता संग्रह चाळताना रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात मुशाफिरी केल्याचा भास होतो आहे. सारीच फुले - फुलझाडे आपल्या भोवती गर्दी करताहेत बघावे तिकडे फुलेच फुले ! लाल, पिवळी, पांढरी, नारंगी, निळी, गुलाबी ...... छोटी, मोठी, चिमुकली, टपोरी, .... हसरी, लाजरी, गोजिरी, लहरी... त्या मखमलीवर तास न् तास मनसोक्त लोळत रहावेसे वाटते ......
कारण हा काव्य संग्रह आहेच मूळी खास ! यातल्या सगळ्याच कविता या फक्त आणि फक्त फुलांवर आहेत. फुलांवर काय अन किती लिहावे? असा प्रश्न कोणत्याही कवीला अथवा लेखकाला सहज पडेल. फार तर चारदोन कविता करता येतील परंतू संपूर्ण पुस्तकच फूलमय हे फक्त कवयित्री सौ.प्रतिभा विभूते याच करु शकतात ! हे पुस्तक वाचल्यावर नक्की समजते.
प्रा. विजय काकडे