संस्कृत अभ्यासक. वारकरी सांप्रदायिक कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार. समाज माध्यमांत सातत्याने भारतीय तत्वज्ञान, संत साहित्य इत्यादी विषयक लेखन.
Book Summary
चंद्रामृत भाग २ हेपुस्तक आपल्या हाती देताना आनंदाची अनुभूती येत
आहे. अनेक ठिकाणी व्याख्यान प्रवचन वृत्तपत्र लेख आदि निमित्तेकरून विविध
विषयांवर चिंतन मांडण्याची संधी मिळते. मात्र अशा व्याख्यानांची लिखित टिपणं
तयार करण्याची सवय मला नव्हती. मी वक्ता म्हणून चिंतन मांडतो. अनेकदा
ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी पासून उपस्थित सर्व त्यांचे अभिप्राय देतात. आणि त्या
संभाषणाची परिपूर्ती होते. असा प्रघात अनेक वर्षेसुरु आहे. मात्र या प्रवचन किंवा
व्याख्यानांच्या निवडक विषयांचेलेख असावेत आणि त्या लेखांचा संग्रह असावा,
जेणेकरून हे चिंतन अधिकाधिक लोकांपर्यंत पोचेल.