विठोबा, विठुराया, पांडुरंग,रुखूमाईवरा, पंढरीनाथा,कान्हडा यांसारख्या अनेक नावाने ज्यांचे वर्णन केले जाते तो विठ्ठल म्हणजे श्रीकृष्णाचा द्वापार युगातील दुसरा व दशावतारातील श्री विष्णूचा नववा अवताराच..
ज्यांच्या शिरावर त्रिलोकाचा मुकूट,भाळावर चंदन टिळा,कानी मत्स्य कुंडल, गळा कौस्तुभ मनी विराजित,बाहु वाहे वारकरी भार,ज्यांचे कटेवरी हात,जो नेसतो कांसे पितांबर, मध्यभागी असे कृष्ण अवतारी काठी, पायात मुक्ताई चे तोडे, पायाखाली विठ अठ्ठाईस युगे, चंद्रभागा तटेवरी पुंडलिक सेवा करी, वर्णावे ऐसे रुप विठ्ठलाचे म्हणे विष्णू दास,अंती व्हावे भक्तांवरी तुझी कृपा पांडुरंगा .
या काव्य संग्रहा मार्फत भक्ती भाव व भागवत संप्रदाय पुन्हा रुजवण्याचा व घडवण्याचा हा एक यत्न ...