निरनिराळे विषय, निरनिराळ्या व्यक्तिरेखा घेऊन या कथा लिहिल्या आहेत.
इथे तुम्हाला अर्धनारी-पुरुषाची भेट घडेल, त्याच्या यशस्वी करियरची ओळख होईल. बलात्कारी माणसाचे अंतरंग वाचता येईल. एकलकोंडया जीवांच्या आयुष्यात डोकावता येईल. घर, ऑफिस आणि आईपण याचे संतुलन सांभाळताना होणारी आईची ओढाताण बघता येईल. बापमाणूस समजून घेता येईल. कावळाकावळीचा संसार जवळून बघता येईल. जीवनाचे आणखीही बरेच रंग, अनुभव कथा रूपात वाचता येतील.