आपण जगत असलेलं वास्तविक जग आणि आपल्या मनातदडलेलं काल्पनिक जग यात नेहमीच तफावत असते. परिकथेतीलराजकुमाराबद्दल असणाऱ्या अपेक्षा आणि तो जर वास्तवात आला तरत्याच्यासोबत हवेसे वाटणाऱ्या किंवा संभाव्य असणाऱ्या प्रसंगांना या लघु
कविता संग्रहाच्या रूपाने एकत्रित केले आहे. प्रत्येक कवितेच्या मागे तिचंस्वतःच एक जग असतं, एक कारण असतं ज्यामुळे ती कविता उदयालाआलेली असते. या पुस्तकातील कवितांच्या मागेही प्रेमातला प्रत्येक
चांगला-वाईट भाव आणि प्रेमातील प्रबळ इच्छा शक्ती आहे.'तो राजकुमार' हा लघुकविता संग्रह प्रेमाच्या काल्पनिक जगातवाचकांना घेऊन जाणार आहे. वाचन करताना ‘राजकुमार’ प्रत्यक्ष जगातअस्तित्वात आहे असा भास होण्याची दाट शक्यता निर्माण होईल अशा
प्रसंगाचा आणि शब्द-संगतीचा सुबकरीत्या वापर करण्यात आला आहे. हेपुस्तक तुमचं हृदय स्पर्श करेल आणि तुमचा साहित्यिक अनुभवसकारात्मक पद्धतीने द्विगुणित करेल अशी आशा आहे.