आताशा युरोप टूर काही अप्राप्य किंवा दुर्मिळ राहिलेली नाही.
बहुतेक सगळे मध्यमवर्गीय हे एकदा तरी परदेश वारी करतातच. तरीही मला याचं
अप्रूप या साठी आहे की हजारो जण जातात.. पण अनुभव लिहिणारे कमी
असतात. आणि मी जे पाहिलं..अनुभवलं ते सगळ्यांना सांगावं..त्यातून पर्यटन
विषयक कुतूहल उत्पन्न व्हावं आणि जास्तीत जास्त मराठी लोकांना युरोप
पहाण्याची इच्छा व्हावी या उद्देशाने हा पुस्तक प्रपंच आहे!