" प्रियदर्शिनी... स्त्री मनाच्या कविता " हे काव्यसंग्रह म्हणजे स्त्री मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या अनेक भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी लेखिकेने रचलेली एक कलाकृती आहे. ज्या काव्यमय पुस्तकात आपल्याला सृष्टीतील आणि आयुष्यातील विविध रंग अनुभवायला मिळतात.
आयुष्यभर आनंद द्विगुणित करायला शिकायचं. आनंदात राहायचं. इतरांना आनंद वाटायला शिकायचं.. कुठलंही दुःख मनात ठेवून जगायचं नाही.. ज्यावेळी, मनसोक्त जगावंसं वाटतं. त्यावेळी, मनसोक्त जगायचं. हिंडायचं, फिरायचं, बागडायचं, खायचं, प्यायचं, निवांत क्षण जगायचे. आपल्या माणसांसोबत वेळ व्यतीत करायला शिकायचं..
कारण, आयुष्याचा उतरता काळ कसा येईल आणि कधी येईल, ते आपल्याला कोणालाही माहीत नाही...
- प्रियांका अभिषेक पागार सावंत
स्त्री मनातील खोलवर दडलेल्या भावना
बहर जसा हळुवारपणे उमललेल्या कळीचा…
जीवनातील विविध पैलू उलगडणारा एक काव्यसंग्रह