माता नर्मदा ही जगातील एकमेव नदी आहे जिची तीन हजार पाचशे
किलोमीटरची परिक्रमा करून ऋषि मुनींपासून सामान्य नागरिक धन्य होतात.
या परिक्रमेत निसर्गसौंदर्याच्या विविध छटा; विविध राजे राजवाड्यांनी
बांधलेले विविध घाट, पौराणिक संदर्भ असलेली सुंदर ऐतिहासिक देवस्थाने आणि
नर्मदाकाठची संस्कृती आपल्याला खूप आनंद देते.
महर्षी कपिलऋषींची तपोभूमी असलेल्या बुलबुला कुंडाजवळ असलेल्या
मंदिरातील स्वामींनी दिलेल्या प्रवचनात आम्हास सांगितले की परिक्रमा पायी;
सायकल; मोटर सायकल; कार किंवा बस अशी केली तरी चालेल ही वाहने
आधुनिक युगात उपलब्ध आहेत . त्यामुळे ज्याने त्याने आपापल्या क्षमतेने मनोभावे
माता नर्मदेची परिक्रमा केली तरी त्याचे फळ मिळतेच असे सांगून
महाराजांनी आम्हास आशीर्वाद दिल्यामुळे आमचा उत्साह खरोखरच द्विगुणीत
झाला.
आम्ही बसने प्रवास केला आणि माता नर्मदेच्या प्रेरणेने या मार्गावर
येणारी सृष्टी सौंदर्य असलेली स्थळे त्यांचे पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व अशा
विविध गोष्टीं थोडक्यात लिहिण्याचा मी प्रयत्न केला आहे.