वृत्तबद्ध काव्यप्रकारांबरोबर सुनीत, हायकू, तांका हे विदेशी
काव्यप्रकार सर सहज हाताळतात. हायकू आणि तांका या जपानी
काव्यप्रकारात सरांचा विशेष हातखंडा आहे. या सुंदर रचनांचा आस्वाद
आपण या काव्यसंग्रहात घेणार आहोत.
अनेक काव्यप्रकारांची सुंदर गुंफण या काव्यसंग्रहात झाली आहे.
यातली प्रत्येक कविता वेगळी आहे, लयबद्ध आहे, काव्यरसिकांच्या मनावर
भुरळ घालणारी आहे. ही 'निसर्गाची निळाई' रसिकांच्या मनात अलवारपणे
पसरून त्यांना मंत्रमुग्ध करेल यात शंकाच नाही.- सौ. संपदा राजेश देशपांडे