पैंजण हा माझा तिसरा ललित लेख संग्रह वाचकांसमोर सादर करताना मला अत्यंत आनंद होत आहे. जीवन जगत असताना जे अनुभवले ते वाचकांसोबत शब्दरूपाने वाटावे, हीच यामागची भावना. मला नेहमी असे वाटत असते की आपण डोळसपणे जगावे. आपल्या भोवती घडणाऱ्या लहान, मोठ्या सर्वच घटनांकडे जाणीवपूर्वक पाहिले तर आपला वैचारिक दृष्टिकोन विस्तारतो हा माझा अनुभव आहे. मी जे वाचले, पाहिले, ऐकले, अनुभवले त्यावर सवयीनुसार टिपणे करत गेले. आणि त्याचंच हे फलित आहे असे मी समजते. माझ्या लेखांतूनच मी व्यक्त होत राहिले.
पैंजण या माझ्या ललित लेखसंग्रहात विविध विषयांवर मी माझे विचार मांडलेले आहेत.