इतिहास अभ्यासक, मनस्वी, मेधावी, निसर्ग सौदर्य प्रेमी, सह्याद्री प्रेमी, पुस्तकी किडा, मराठी ब्लॉगर
Book Summary
ही कथा खरंच घडली आहे हा.. फेकत नाहीये मी..
माझी आजी, म्हणजे आईच्या आईची गोष्ट आहे..
पूर्वीच्या काळी म्हणजे आजीच्या लहानपणाच्या काळी साधारण न्हाण आलं की मुलीला शिकवायची नाही ही पद्धत अगदीच सर्रास होती.... शहरात कदाचित वेगळं असू शकेल, पण पार खेडेगावात तर “जिथे तिथे मुलींना आगाऊपणाने वचावचा बोलणं शिकवणारा पुढारलेपणा” पार गावाच्या वेशीबाहेरच ठेवला जायचा....
‘लोक काय म्हणतील, शिवाय मुलींच्या सासरकडची मंडळी काय म्हणतील..”
हा प्रश्न म्हणजे विश्वयुद्धापेक्षाही मोठ्ठा प्रश्न होता तिच्यासाठी....
आजी, तू शहाणी आहेस ना, मग घाबरू नकोस, तुझ्या अभ्यासावर विश्वास ठेव, देवाचं नाव घे आणि सगळे प्रश्न नीट लिही.. पेपर लिहून झाला की एकदा संपूर्ण वाचून घे.... जर तू ह्या तुझ्या परीक्षेत छान मार्क मिळवलेस ना तर I promise, मी आईला सांगीन, आपल्याला फिरायला घेऊन जायला..... फक्त तू, मी आणि आई.. बाकी कुण्णी कुण्णी नाही