चौथ्या खंडासाठी- -
स्वतःच्या विचारांबद्दल सकारात्मक विचार करण्याची सवय म्हणजे " निरीक्षण " या वाटेवरून " कृती" या मार्गाला लागणे. या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची आणि ती सुधारण्याची क्षमता, थोडक्यात स्वतःच्या शिकण्याच्या क्षमतेवर कार्य करणे.
संवेदना, विचार आणि वर्तन या त्रयी वर सकारात्मकतेचे आवरण असले की स्वतःला काय माहित आहे आणि काय माहित नाही या थांब्यावर येऊन ठेपणे. मग निर्णय घेण्याची कृती प्रभावी ठरते, समस्यांची शास्त्रोक्त उकल करण्याची सवय होते, वृत्तींना फलितांचे स्वीकार करता येतात आणि अवघी वाट उजळून निघते. सलग चार वर्षांहून अधिक काळ चाललेल्या या सदराचे हेच गमक आहे. अंधारलेल्या रात्री चंद्रकिरणांची साथ असली की आपण भयरहित होतो.
--
Dr N H DESHPANDE(PhD)