घरांतील बहुतेक मंडळी गोड खात नाही म्हटलं म्हणजे , घरी गोड करण्याचा प्रश्नच त्यामुळे उरत नसे . सणा वाराला फक्त नैवैद्या पुरते गोड होत असे , त्याला देखील दोघे , बहिण भाऊ नखरे करून तुकडा तुकडा खात असत. उरलेले गोड. त्र्यंबक आणि कमला संपवत . कुणा कडे गेले तरी , कार्यात सुद्धा , हे दोघे चहा शिवाय कोणत्या च गोडाला हात लावत नसत. सर्व त्यांना थोडे से गोड खायचा आग्रह करीत असत.पण ‘ मला गोड आवडत नाही’ च्या नावा खाली दोघेही गोड खात नसत , नाके मुरडत असत .त्यामुळे सर्वांना माहित झाले होते यांना गोड आवडत नाही.