मी डॉ उदय अनंत माळगांवकर कल्याण भूषण टाटा मोटर्स मध्ये कार्यरत असून एक साहित्यिक आहे.
Book Summary
आयुष्यभर पैसा पैसा करीत बसलो,
जाणूनबुजून देवा, तुझा पत्ता विसरलो…
हे माझं अन् ते माझं करीत बसलो,
पण देवा, खरं सुख हरवून बसलो…
रात्रंदिवस पैशासाठी धावत राहिलो,
दोन क्षण सुखाचे मात्र शोधत राहिलो…
मिळवले, कमविले भरपूर काही सारे,
पण हातातून सुटले नाही काही खरे…
दारात, घरात, कपाटात भरपूर काही आहे,
मनात मात्र माणुसकीचा झरा आटला आहे…
आता सांजवेळी एक विचार मनात आला,
देवा, आता तरी तुझं स्मरण येईल का मला…
तुझं नाम घेता घेता,मोक्ष मिळेल का मला
विचार करता करता राम तो मज आठवला