कोकणात शिमगा सणातली,होळीची 'गोठण'हे एक असं ठिकाण आहे जीथे उत्सव साजरा करण्यासाठी सारी ग्रामस्थ माणसे एकत्रित येतात.शिमगा सण साजरा करतात,एकत्रीत आल्याने नवी आणि जुन्या पिढीतील वैचारिक अंतर कमी होतं.आपण कोण?याचा परिचयही ईथेच होतो.रुढी पारंपिरीक प्रथा,खास घटना, इतिहास,एकामेकास सांगण्याचा आणि जाणुन घेण्याचा हा एक पारंपारिक रंगमंच आहे.आणी या रंगमंचावरील आम्ही त्यातले रंगकर्मी, विसाव्या शतकातील पिढी आणी एकविसाव्या शतकातील पिढी यातील अंतर, विसाव्या शतकातील तो काळ, तेंव्हाचं जनजिवन,त्या काळचे परंपरागत सणवार एकविसाव्या शतकातील नवतरुण पिढीला कळावं या हेतुने
'आला बा..! शिमग्याचा सणं..'
हे कथा संग्रह लिहाला आहे.