माणूस आयुष्यात गोष्टी मागे सोडतो आणि पुढे निघून जातो.. पुढे निघून जात असताना सोडलेल्या गोष्टी खरचं विसरतो का..??? आयुष्यात आलेल्या गोष्टी, माणस काही निवडक प्रसंग विसरणं शक्य नसतं.. पुढे चालत असताना मात्र ह्या सगळ्याच ओझं घेऊनच जावं लागत... कधी कधी कितीही विसरायचं म्हणलं तरी आपण काही गोष्टी विसरू शकत नाही.. मागील आयुष्यात घडलेल्या प्रसंगाची भीती इतकी मनात असते की नव्या आयुष्यात त्या गोष्टी पुन्हा घडतील म्हणून बरेचदा आपण काही गोष्टी टाळतो..
पण ते ओझं आयुष्यभर सोबत घेऊन च जगावं लागत हे मात्र नक्की..