मागच्या भागात आपण बाराक्षार चिकित्सा पद्धती या *नो साईड-इफेक्ट* चिकित्सा पद्धतीची तोंडओळख करून घेतली. आज आपण या बारा वेगवेगळ्या क्षारांबद्दल अधिक माहिती करून घेऊ. मागच्या भागामध्ये मी सांगितल्याप्रमाणे हे बाराक्षार संपूर्णपणे नैसर्गिक आहेत. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की हे क्षार म्हणजे कुठल्याही प्रकारचं औषध नाही. आपण जे वेगवेगळे अन्नपदार्थ सेवन करतो त्या वेगवेगळ्या अन्नपदार्थांमध्ये हे सर्व क्षार काही ना काही प्रमाणात उपलब्ध असतात. आणि म्हणूनच या बारा क्षारांपैकी कुठल्याही क्षाराचा कुठल्याही व्यक्तीवर कोणताही दुष्परिणाम होत नाही.
या क्षारांचे अन्नपदार्थांमध्ये असलेले प्रमाण अतिशय कमी असते म्हणून मुबलक प्रमाणात हे क्षार मिळण्यासाठी यांना एकत्र करून त्याच्यांवर प्रक्रिया केली जाते. होमिओपॅथिक पद्धतीने या क्षारांचे रूप अतिसूक्ष्म केले जाते जेणेकरून या क्षारांचे रक्तात मिसळणे सोपे होते.
या क्षार चिकित्सेचे होणारे परिणाम हे एखाद्या चमत्कारा सारखे जरी वाटत असले तरीही ते संपूर्णपणे बाराक्षार चिकित्सा पद्धतीच्या तत्त्वांवर अवलंबून असतात. भुकेलेल्या माणसासाठी अन्न ज्याप्रमाणे काम करते व तात्काळ शक्ती प्रदान करते त्याच प्रमाणे भुकेलेल्या किंवा कुपोषित पेशींवर बाराक्षार चिकित्सा पद्धतीने कमी पडलेले क्षार पुरवल्या जातात आणि त्या आजारी पेशींमध्ये तात्काळ फरक दिसून येतो. एखाद्या आजाराला समूळ नष्ट करण्यासाठी बाराक्षार चिकित्सा पद्धती अतिशय परिणामकारक आहे कारण ती आजाराच्या मूळ कारणाला दूर करते.
या बारा क्षाराची नावं आता आपण जाणून घेणार आहोत. यांची नाव जरा मोठी असल्याने त्यांचे शोर्ट फ़ोर्म्स वापरल्या जातात. हे शोर्ट फ़ोर्म्स चं जास्त प्रचलित आहेत.
1. CALC. FLUOR. (Calcium Fluoride)
2. CALC. PHOS. (Calcium Phosphate)
3. CALC. SULPH. (Calcium Sulphate)
4. FERR. PHOS. (Iron Phosphate)
5 KALI MUR. (Potassium Chloride)
6. KALI PHOS. (Potassium Phosphate)
7. KALI SULPH. (Potassium Sulphate)
8. MAG. PHOS. (Magnesium Phosphate)
9. NAT. MUR. (Sodium Chloride)
10. NAT. PHOS. (Sodium Phosphate)
11. NAT. SULPH. (Sodium Sulphate)
12. SILICA (Silica Oxide)
आता आपण या बारा क्षारांची नावं बघितली. याच्यात असलेल्या मूळ क्षारांबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत. ही 12 नाव व्यवस्थित लक्षपूर्वक वाचली असता आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल ती अशी की एका मूळ क्षाराचे इथे वेगवेगळे फॉर्म्स आहेत. मुळात हे सहा वेगवेगळे क्षार आहेत. कॅल्शियम पोटॅशियम आणि सोडियम या तीन मुख्य क्षारांचे पुढे तीन-तीन असे संयुक्त क्षार आहेत, ज्यांची नावं कॅल्शियम फ्ल्यूरोईड, कॅल्शियम फॉस्फेट, कॅल्शियम सल्फेट तसेच पोटॅशियम क्लोराईड, पोटॅशियम फॉस्फेट, पोटॅशियम सल्फेट आणि सोडियम क्लोराइड, सोडियम फॉस्फेट, सोडियम सल्फेट असे आहेत. याव्यतिरिक्त मॅग्नेशियम या क्षाराचे फॉस्फेट, फेरम म्हणजेच आयरन चे फॉस्फेट व सिलिका या क्षाराचे ऑक्साईड आहे. अशा प्रकारे एकूण १२ क्षारांची आता आपली ओळख झालेली आहे.
पुढल्या भगांमध्ये आपण आधी मूळ क्षारांबद्दल जाणून घेणर आहोत. याचे शरीरातील महत्व, नैसर्गीक स्त्रोत तसे याच्या कमतरतेमुळे होणारे आजार व ईतर माहिती आपण पुढील भागांमध्ये बघू.
डॉ. सुरूची अग्निहोत्री नाईक
पीएचडी ह्यूमन न्यूट्रिशन
(लेखिका अनेक वर्षांपसून टिशू सॉल्ट थेरपिस्ट म्हणून कार्यरत आहेत)