पानी पानी रे
मंडळी नमस्कार, कालच म्हणजे २२ मार्चला 'जल दिन ' साजरा झाला. आजकाल आपणाला अनेक दिन साजरे करण्याची सवय लागलीय. एखादा विशिष्ठ दिन, त्याच दिवशी साजरा करण्या मागे काहीतरी तर्क/ इतिहास/ नोंदी नक्की आढळतात.
" विश्व जल दिन" २२ मार्च साजरा करण्यामागे ही अशीच काही कारणे असतील.
मार्च महिन्याच्या शेवटाला, उन्हाचा तडाखा वाढत असताना, धरणातील पाणीसाठा कमी होत असताना, पाण्याच्या एकेक थेंबाचे महत्व समजावून घेण्यासाठी हा 'जल दिन ' साजरा होणे फारच संयुक्तिक नाही का?
पावसाळा येऊन गेल्यानंतर, सर्व धरणे, पाणवठे, विहिरीत मुबलक पाणी साठा झाल्यावर
प्रीतीचं झुळझुळ पाणी, वा-याची मंजुळ गाणी
किंवा
संथ निळे हे पाणी
वर शुक्राचा तारा
कुरळ्या लहरींमधुनी
शीळ घालतो वारा
या कवी कल्पना ठिक वाटतात. पण दुष्काळाचे चटके, जनावरे, शेती साठी पाण्याचा तुटवडा दिसू लागला की ओघळणारे अश्रू , पाण्याचे महत्व अधोरेखीत करुन जातात डोळ्यातुन ओघळणारे हे अश्रू म्हणजे पाणीच नाही का?
वसंत बापटांनी ही या पाण्याबद्दल काय म्हणलय बघा
या पाण्याचीओढ भयानक
नेई अचानक डोहाखाली
चुकू लागले नाडी ठोके, अंगांगावर गुंगी आली
पाण्याच्या थेंबाचे महत्व आपण जाणतो. सृष्टीत नवचैतन्य , नवनिर्मिती करण्याचे सामर्थ्य निसर्ग लीलया पेलतो ते या पाण्याच्या जोरावर नाही का? अर्थात इतर अनेक घटकही सहाय्यभूत ठरतातच, पण पाण्याची भूमिका महत्वाची ठरते
गेल्या काही वर्षांपासून अनेक संस्था पाण्याचे महत्व ओळखून जनजागृती करत आहेत. अनेकांनी बदल केले आहेत, गावच्या गावे अनेक मोहिमा राबवत आहेत आणि आपला गाव, देश सुजलाम्,सुफलाम् व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत.
पण आज गरज आहे अशा लोकांचे कौतुक करायची, त्यांना प्रसिद्धी द्यायची.
गेल्या दहा वर्षातील मिस इंडिया किंवा मिस युनिव्हर्स आम्हाला तोंडपाठ आहेत पण गेल्या दोनवर्षातील ' पाणी' फाऊंडेशन मधे विजयी झालेल्या गावाची नावे आम्ही नाही सांगू शकत देवा . ज्यावेळी भारतातील तमाम जनता टीव्ही समोर बसून कुठल्याही सिने अवार्ड पेक्षाही अधिक उत्साहाने ' पाणी ' किंवा तशा संस्थेचा पारितोषिक वितरण सोहळा पाहिल स्वतःच्या गावात / घरात पाणी वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल, विकेंडला ही गावे बघण्यासाठी लोकांच्या झुंबड उडतील तो दिवस नक्कीच 'सोनियाचा' असरक
And this year award goes to -----
यंदाचे विजेतेपदाचे मानकरी ,
वॉटर कप स्पर्धा 2018 ची विजेते गावे आहेत –
प्रथम क्रमांक – टाकेवाडी (आंधळी) ता. माण, जी सातारा
द्वितीय क्रमांक – भांडवली, (ता.माण, जी. सातारा) आणि सिंदखेड (ता. मोताळा जी. बुलढाणा)
तृतीय क्रमांक – आनंदवाडी (ता.आष्टी) आणि उमठा (ता. नरखेड, नागपूर)
हा स्तंभ लेख लिहिताना संग्रहित नावे मिळाली तरी.
त्यानंतर अशी काही स्पर्धा झाल्याचे आमच्या गावीही नसेल.
सर्वांचीच ही अवस्था आहे. चला बदलू या , पाणी वाचवू या, देश घडवू या
अमोल