• 27 April 2021

    मंगळवारची टवाळखोरी

    भावपूर्ण श्रध्दांजली

    5 191

    भावपूर्ण श्रध्दांजली

    आज परत एकदा थोडा वेगळा विषय, सीरिअस मोड वर मांडतोय. स्तंभ लेखनाच्या शीर्षकाच्या एकदम विसंगत. ही टवाळखोरी अजिबात नाही . पण हे लिहायचे खूप दिवसापासून मनात होते.

    श्रध्दांजली, भावपूर्ण श्रध्दांजली, RIP, आत्म्यास शांती लाभू दे इ वाक्ये सध्या सोशल मिडियावर म्हणजेच व्हाटसप ग्रुप असेल फेसबुक असेल इथे वारंवार वाचायला मिळत आहेत, लिहावी लागत आहेत. परिस्थितीच तशी झाली आहे आणि वारंवार या शब्दांचा वापर करायला लागणे ही सर्वांसाठी दुख:दायक गोष्ट आहे यात शंका नाही.

    पण आजकाल ब-याचदा ही गोष्ट केवळ एक उपचार म्हणून आपण करतो का असे वाटण्यासारखी स्थिती बघायला मिळतीय.

    पूर्वी जेंव्हा अगदी लांबची/ नातेवाईक नसलेली पण ओळख असलेली, दुरच्या कुणा नातेवाईकांकडची परिचित, एखाद्या समारंभापुरती भेटलेली व्यक्ती ही जेंव्हा काही कारणाने अनंताच्या प्रवासास निघून गेल्याचे कळायचे तेंव्हा वाईट तर वाटायचेच पण एक अस्वस्थता मनात रहायची, कामात लक्ष लागायचे नाही. रक्ताचे नाते असायचे आपले असे नाही, पण आपल्यात माणुसकी असायची

    अर्थात भा.रा तांबे नी लिहून ठेवलय

    " जन पळ भर म्हणतील हाय, हाय "
    अर्थ वेगळा सांगायची गरज नाही, सर्वांना माहितच आहे

    आज सोशल आपण जास्त झालोय आणि त्यांचे हे वाक्य आज शब्दश: लागू पडतय. जन "पळ "भरच. म्हणजे अक्षरशः काही सेकंद/ मिनिटे शोक व्यक्त करुन पुढे जात आहेत

    त्या शोक व्यक्त करण्यात/ श्रध्दांजली वाहण्यात उपचार / फाॅर्मेलिटी झालीय का?
    एखादी प्रसिद्ध व्यक्ती गेली, असे कळले की भराभर आपण तो मेसेज फाॅर्वर्ड करतो. बातमी म्हणून मेसेज फाॅर्वर्ड करणे ठिक पण ' श्रध्दांजली लिहिलेले पण फाँर्वर्ड? हे वाक्य ही आपण लिहू शकत नाही? काय अर्थ आहे त्या 'भाव' पूर्ण ला?
    बर अगदी ठिक आहे बातमी म्हणून ते ही वाक्य फाॅर्वर्ड केले. निदान नंतर ती व्यक्ती / कलाकार / परिचीत यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त एखाद्या शब्दात? ते ही नाही.
    असं काही नाही की सगळ्यांना लिहिता येईल. पण जेंव्हा एखाद्या घडलेल्या घटनेने/ व्यक्तीच्या जाण्याने जेंव्हा वाईट वाटते तेंव्हा जी मनाची चलबिचल अवस्था व्हायला पाहिजे ती होताना दिसत नाही कारण अगदी लगेचच पुढच्या क्षणी आपण अगदी सहज पणे राजकीय मेसेज, विनोद, शुभेच्छा देण्यात मग्न होतो.

    अगदी क्षणभर समजू एका समुहात आपण त्या समुहासंबंधीत कुणाचे निधन झाले म्हणून श्रध्दांजली देतो, दुस-या समुहात जिथे या गोष्टीचा संबंध नाही तिथे हास्य विनोदात रमतो. एवढी लवचिक मानसिक अवस्था झालीय आपली? एवढ्या भावना बोथट झाल्यात की एकीकडे दु:ख एकीकडे आनंद, हास्य विनोद करावा?
    सह - वेदना, संवेदना कुठे गेल्यात?

    काही कारणाने जेंव्हा सरकार राष्ट्रीय दुखवटा वगैरे जाहीर करते तेंव्हा करमणूकीचे कार्यक्रम सरकारी वाहिन्या/ आकाशवाणी इ माध्यमावर दाखवत नाहीत. पण आम्ही ? त्याप्रमाणे वागतो का? हा तर मोठा विषय आहे तुर्त इतकेच

    लिहिलेले पटले तर एकदा नक्की विचार करुन आवश्यक तो बदल करता येतोय का ते पाहू या

    ॐ शांती , शांती

    अमोल केळकर



    अमोल केळकर


Your Rating
blank-star-rating
Veena Kantute - (27 April 2021) 5
फार महत्त्वाचे, खरंच खूप असंवेदनशीलतेने मेसेज फाॅरवर्ड केले जातात. कधी कधी तर स्वतः आधीच फाॅरवर्ड केलेला पुन्हा टाकतात. काय विषय चालला आहे ते बघणे तर दूरच.

1 0

Kavita. Dindulkar - (27 April 2021) 5

0 0

Varsha Sanjay - (27 April 2021) 5

1 0

उज्वला कर्पे - (27 April 2021) 5
अगदीच बरोबर कथन ,सध्याच्या परिस्थितीत माणूस माणुसकी ला मुकला आहे एखाद्या ग्रुपमध्ये तो किमान एक दिवस तरी शांत बसू शकत नाही

1 0

ऋचा दीपक कर्पे - (27 April 2021) 5
खरंय... भावना बोथट झाल्या आहेत...! आज ह्या परिस्थितीत माणसाला जोक्स सुचतात कसे???

1 0