महिला दिन नावांलांच...
घरचं आणि बाहेरचं करणारी महिलाच
एवढं करून बाई कुठे काय करते?
हा टोमणां आहेच
महिला म्हणजे माहेरचं
प्राजक्ताचं झाड
सासर मोहवून टाकणारा सडा
बलात्कार,खून,विद्रूप चेहरा
जळणं यावर अजून तरी
नाही सापडलां ऊतारा
काही प्रथा नांवालाच गेल्या
मनातल्या व्यथांच अग्नीहोत्र
चालूच आहे
पुराणातली वांगी आजही आहेत
महिला दिन होतो नुसता साजरा
महिला दीन नसेल तोच खरा महिला दिन
चेहऱ्यावर हास्य फुललें तरच
तो खरा महिला दिन.
डॉ.अनिल कुलकर्णी.