पाणी ,जल , वाॅटर या तिन शब्दाचा आपल्या जीवनाशी रोज संबंध येतो.
आजचा विषय आहे "पाणी ". पाण्याचे माणसाच्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे हे प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही. कारण की पाण्या पेक्षा श्रेष्ठ असं दुसरं कोणीच नाहीये पाण्याचे महत्व किती आणि कोणते ते सांगत बसण्यापेक्षा पाण्याचा वापर किती प्रमाणात आणि कसा करावा याचा विचार करणे गरजेचे आहे. आणि पाणी कसे वाचविता येईल .याचा विचार आपल्याला करणे हे गरजेचे आहे.
दिवसेंदिवस पावसाळा या ऋतुत पाऊस पडण्याची पातळी फार कमी झालेली आहे. आणि पावसाळा मधील पाऊस पडण्याची पातळी कमी झाल्यामुळे जमिनीमध्ये पावसाची किंवा पाण्याची साठवणूक कमी प्रमाणात होत आहे.
त्यामुळे जमिनीचा कस कमी होत आहे .आणि त्यामुळे शेतीमध्ये मिळणारी पिके ही कमकुवत तयार होत आहे, उत्पादन क्षमता कमी झाले आहे.
त्यांना लागणारा योग्य खनिज साठा खनिजद्रव्ये ही पाण्याच्या अभावी कमी होत आहे.
पाण्याचा जलस्तर हा कमी होत असताना आपण जमिनीची निगडित असलेली माणसे पाण्याचा अपव्यव करत आहो .
हे आपल्या नजरेसमोर दिसून सुद्धा, आपण आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून नुसता पाण्याचा हैदोस मांडलेला आहे.
सारी सजीवसृष्टी, सारा निसर्ग ,मुंगी ,किडे, जलचर प्राणी ,वनचर प्राणी ,भूचर प्राणी आणि मानव यांना प्रत्येकांना पाण्याची अत्यंत गरज आहे. जल ही जीवन है. पाणी हेच जीवन आहे, पाण्याशिवाय काहीच नाही हे सगळं माहित असून सुद्धा आपण रोजच्या जीवनात नको त्या ठिकाणी आणि नको तिथेपाण्याची हेळसांड करतो.
किंवा पाण्याचा कितीतरी प्रमाणामध्ये दुरुपयोग करतो .तो होणारा दुरुपयोग कुठेतरी आपल्याला थांबवायचा आहे. आणि हे पाणी आपण जर आज जतन केले. तर उद्या त्याचा साठा आपल्या समोरच्या पिढीला मोठ्या प्रमाणात मिळेल.
आणि पाण्याची कमतरता भासणार नाही. ही आपल्या मराठी चित्रपट सृष्टीतील कलावंत श्री नाना पाटेकर ,श्री सयाजी शिंदे, श्री मकरंद अनासपुरे आणि कितीतरी, श्री .अमीर खान आणि कितीतरी लोकांनी एकत्र येऊ पाण्याचे संवर्धन, संशोधन केलेले आहे .त्यांनी वाॅटर बॅक ,वाॅटर ऐटीएम काढले आहे.
तर चला मंडळी आपणही ही या कार्यामध्ये सहभाग घ्यावा. आणि आपल्या क्षेत्रात, आपल्या समाजात ,आपल्या देशात पाणी वाचवण्याचा एक नवा संकल्प करूया. उन्हाळ्याच्या ऋतू मध्ये जो कोणी तहानलेला असेल ,त्याला पाणी देऊन आपण आपला पाण्याचा धर्म निभवुया .मग तो मानव असो, पशु असो, वा पक्षी असो .
पाण्याचा धर्म सर्वात श्रेष्ठ धर्म
धन्यवाद
जय हिंद जय जय भारत