• 26 August 2022

    कवडसा

    भूतकाळ... वर्तमानकाळ

    5 121

    भूतकाळ ....वर्तमानकाळ...

    फ्लॅट रिसेल ला लागले की त्यांची किंमत ठरवण्याचा महत्त्वाचा निकष म्हणजे, "बाजूचा फ्लॅट कितीला गेला?" बाकीचे पुढे वजाअधिक करून मग त्याप्रमाणात फ्लॅटची किंमत ठरते. विद्यार्थ्याला आधीच्या परिक्षेत किती टक्के मिळालेत यावरच उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळतो अन आधीच्या नोकरीत काय केलेत यावरून पुढची नोकरी मिळते.... गंमतच ना!

    भूतकाळात रमणे आणि रुतणे या प्रक्रिया निरनिराळ्या आहेत. वेळ दोन्हीमध्ये व्यतीत होतो; परंतु निष्पत्ती मात्र भिन्न-भिन्न! भूतकाळ पुसून टाकणे कठीणच. कारण आपल्या आजवरच्या जीवनप्रवासात गोळा केलेले धडे, बोध, ज्ञान, कौशल्य, विचार, धारणा, भावना आणि अनुभव हे आपली ओळख बनतात. आपण वर्तमानकाळ अनुभवतो तो या घटकांच्याच बळावर. प्रत्येक क्षण हा या पोतडीत नवनवीन गोष्टी भरत असतो व आपला भूतकाळ संपन्न करत असतो. ‘स्वत्वा’चा शोध सुरू झाला की आपण आपला भूतकाळ तपासू लागतो. आपण कोण व कसे होतो, आता कसे आहोत व आपल्याला कसे व्हायचे आहे, या सततच्या अवलोकनाबरोबर आपण सतत गतअनुभवांची कास धरत असतो. हे अनुभव महत्त्वाचे. कारण स्वत:चे स्वत:शीच तुलनात्मक विश्लेषण करण्यासाठी ते उपयुक्त ठरतात.


    तुम्ही आत्ता कसेही असा, तुमची किंमत मात्र तुमच्या भूतकाळाच्या अवतीभवतीच फिरत असते. भूतकाळ टाळणे, अमान्य करणे, त्यापासून पळणे अशक्य आहे पण त्याचं ओझं होऊ देऊ नये. आपल्याला तो भूतकाळही जपता यावा. मिरवता यायला हवा. हा हातात असलेला प्रत्येक क्षण उद्याचा भूतकाळ आहे, हे लक्ष्यात ठेवलं की झालं.

    -अनुपमा



    अनुपमा विजयन


Your Rating
blank-star-rating
ऋचा दीपक कर्पे - (10 September 2022) 5
मी तर म्हणते भूतकाळातून शिकावे, भवितव्याची स्वप्ने रंगवावी आणि वर्तमान मन भरून जगावे....

0 0

Alka Puntambekar - (26 August 2022) 5
खूप छान

0 0