योद्धा....
खूप मुसळधार पाऊस सुरु आहे... पाऊस अगदी लहानपणापासून आपण बघतोच ना!! तरी दरवेळी नवसाचा भासतो नाही का? आणि तो कसा पडतो आहे ?...हे बघण्यास पाय खिडकीकडे वळलेच पाहिजे.
बाहेर पहिले तर सगळीकडे टपोरे थेंबच थेंब ....वाऱ्याच्या झोताबरोबर इकडून तिकडे उडणारे लाखो थेंब... त्यात कोणी जमिनीवर आदळत आहे... तर कोणी अलगद जाऊन फुलाच्या कुशीत विसावत आहे ...आपण जमिनीवर पडू कि फुलावर ? ह्याचा जरापण विचार न करता बस ...पडायचं ह्याच विचाराने पछाडलेले ...त्या काळ्या ढगांमधून बाहेर पडायचे आहे... बस ह्या मोकळेपणे ...पडणाऱ्या थेंबांना पाहून ... मला सुद्धा त्याच्या मोकळेपणाचा... त्याच्या बिधास्त असण्याचा ....हेवा वाटला.... यांना पाहताना असं वाटलं कि ...मी पण एक थेंब व्हावे आणि अलगद पणे ह्या खिडकीतून बाहेर जावे हा वारा नेईल त्या दिशेला आणि अलगदपणे एका नुकत्याच उमलणाऱ्या फुलावर किंवा वाऱ्याच्या झोतामध्ये नाचणाऱ्या पानावर जाऊन विसावे.
पण असे होणे नाही हो आपल्या आयुष्यातील आपला कर्म विसरून जमत नाही
©अनुपमा