आधुनिक भारत अन पारंपारिक भारत अश्या दोन जीवनपद्धती आप-आपले स्वतंत्र अस्तित्व जपताना दिसतात तश्या एकत्र होतानाही अनुभवायला मिळतात. तुम्ही जरा आपल्या आजूबाजूला बघाल तर अनेक अश्या विविध जीवनपद्धती दिसतील कि तुम्ही पण म्हणाल जिंदगी तेरे रूप हजार
रस्त्याच्या ह्या बाजूला Mac-D अन त्या बाजूला वडा-पावची गाडी..इकडे शेला-पागोट्यावाला शेतकरी अन तिकडे IT वाला..कधी आप-आपल्या बैल-गाडी/बस मध्ये तर कधी एकाच टम-टम मध्ये एकाच bus-stop वर नववारीतली आजी अन दुसऱ्या बाजूला लेटेस्ट ड्रेस मधली करिअर वाली मुलगी…अश्या छोट्या-छोट्या गोष्टी बघायला मस्त वाटतं…एकंदरीत आयुष्य कसं स्वत:चा मार्ग स्वत:च शोधून वाट-चाल करतं ह्याचीच जाणीव होत राहते प्रत्येक निरीक्षणातून…प्रत्येक चित्राला मनात वेग-वेगळ्या भावना…हसू, दुख, उत्साह, उद्वीग्नपणा, चीड-चीड…नेम नाही, खिडकी काय दाखवेल पुढच्या क्षणाला…
काल असंच काहीसं झालं… मी सिग्नलवर थांबली होती जरा वेळ... इकडे तिकडे बघण्याचा माझा छंद....
सिग्नल ला एक जुनी लुना (इथे लुनाला ‘जुनी’ विशेषण लावावं का हा ही एक प्रश्नच!), घरातला कर्ता ती चालवतोय, पुढे २-३ वर्षाचा एक मुलगा, मागे २ वर्षाचा एक, त्याच्यामागे बायको, अन बायकोच्या मांडीवर एक बाळ…!!! पुढे बसलेल्या मुलाचे पाय रस्त्यावर टेकत होते त्यामुळे त्याने ते पंखासारखे दोन्ही बाजूना पसरवले होते....३० sec च्या वेळेत खिशातून गुटखा काढून तोंडात कोंबतोय…मागे बायको कशी-बशी स्वत:ला अन छोट्या बाळाला सांभाळते आहे… … … … … … … … …
म्हणजे बघत रहावं की दुर्लक्ष करावं ह्या दुविधेत मध्ये मन….
एकच विचार येऊन गेला मनात….५ आयुष्य एका लुनावर मार्ग शोधत होती… आणि आपण एकटे आपला मार्ग शोधू शकत नाही का ?? आयुष्याची खिडकी काय दाखवेल पुढच्या क्षणाला…कुणास ठाऊक ??