मी बोलेन नंतर... हे मी कसं काय बोलायचं??...हे कुणाशी बोलू ??.. असं मनात बरंच साठत राहतं नि आपलं मन नकोशा प्रश्नांनीच जड होतं....बाकी सगळेच या जडत्वाशी अनभिज्ञ! कुणालाही सुतराम कल्पना नसते.... मनात काय काय सुरु आहे..... वर त्यांना काहीच वाटत नाही हे पाहून आपल्या मनाचा फार कोंडमारा होतो.
एका विशिष्ट पातळीवर आल्यावर एकतर ते कुणाशी बोलता येत नाही किंवा आपण सगळं सांगणार असू पण समोरचा ऐकणार नसतो. त्यातले संदर्भ हि जुनेपुराणे झालेले असतात. ते तितक्याच तीव्रतेने आणखी कुणाला कसे जाणवतील... सांगा बरं??
मला तरी वाटतं याला उपाय म्हणजे बोलतं राहा पण त्याच वेळी. नंतर बोलण्यात काहीच अर्थ नसतो.
आपलं काम आपण चोख केलं की मग आपण उदाहरण बनतोच ना.. नाही का?
बघा जमत का!!
अनुपमा