मन झाले जणू केळयाचे. ..घड! १२/०२/२००१
आज माझं मन केळ्याचा घड झालं आहें . मनाच्या तळाशी जपून ठेवलेली एकेक आठवण केळयाला हळुवार सोळावं तसं सोलत मनावर मुक्तपणे रेंगाळते आहे. त्यांचं हे रेंगाळण मनावर एक विलक्षण रोमांच उठवतो आहे. खूप हवा-हवासा वाटणारा. दिर्धाकाळ तो रोमांच मानावर टिकावा असं मनाला सातत्यानं वाटू लागलं. त्यांच्या अस्तीत्वाच नाद, त्यांचा स्पर्श, मनाला बेहोष करून टाकु लागला या बेहोशीची एक लकेर माझ्या तना-मनात घुमू लागली...............
मनं बहरे--बहरे आठवणींच्या मुक्त आकाशात ,
आकाश माझा सांगाती आहे मी त्याच्या ऋणात .
वयाची 'बुज' ही सरली दडपणाची नाही कुठली भीती,
मुक्या वयातील मुक्या स्मृती माळा गळा शोभती
आज होऊ दे बेहोष मला ,विसरू दे नियमांचे बंध,
मस्तीत करू दे 'दंगा' जोडू द्या मज ते रेशीम बंध.
मनाची जडणघडण सहजपणे समजण्या सारखी नाही आठवणी मनाच्या तळाशी कधी,केव्हा जाऊन रूजतात हे जाणत्या मनाला कळत ही नाही.सुप्त मनाच्या असतात या सगळ्या उचापती.आठवणींचे घडच्या घड हळूवारपणे त्यालाच जपून ठेवता येतात.त्याला त्यात रमायला फार आवडतं. जाणतं मन मात्र वर्तमानातील कवडसे ओंजळीत पकडत असतो.त्यातील शुद्धता,पावित्र्य सच्चेपणा याचे निरीक्षण करत असतो.हे करत असतांना कधीकधी द्वाड क्षणांचे कवडसे मनावर ओरखडे ऊमटवतं.त्यानं दुखावलेलं जाणतं मन कुठेतरी हे दु:ख विसरायचा प्रयत्न करतो तेव्हाच हे सूप्त मन त्याच्यासमोर आठवणींचा घड हळुहळू सोलतो.काहीक्षणात जाणत्या मनावर आलेलं विषण्णतेचं मळभ दूर होतं.
मनाचा हा द्विपदरी पापुद्रा समजून येणं तसं कठीणच आहे पण अशक्य मात्र नाही.
----------------------------------------------------------------------------
###. मीनाक्षी वैद्य.