सर्व वाचकांना दीपोत्सव चा नमस्कार! दिवाळी हा हिंदू धर्माचा सर्वात मोठा पवित्र आणि प्रसिद्ध सण आहे. दसरा झाल्यावर सर्वांना दिवाळीचे वेध लागतात लहान मुले वडीलधारी मंडळी दिवाळी म्हटल्याबरोबर प्रत्येकाच्या मनात आनंद आणि उत्साहाचा संचार होतो हा सण संपूर्ण भारतात अतिशय उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो.
दीपोत्सव साजरा करण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आयोध्येचे राजा महाराजा दशरथ त्यांनी आपली पत्नी कैकयीला वचन दिले होते आणि ते वचन पूर्ण करण्यासाठी श्रीरामाला 14 वर्षाचा वनवास दिला होता तो वनवास पूर्ण करून श्रीराम अयोध्येला परतले. श्रीराम अयोध्येला जेव्हा परतले तेव्हा त्या आनंदात अयोध्येच्या लोकांनी अमावस्येच्या रात्री ला प्रकाशमय रात्र केली अयोध्येच्या प्रत्येक गल्लीदारी घराघरात देवले दिवे लावले गेले आणि अयोध्या सोनेरी प्रकाशाने न्हाहून उठली.
दिवाळीच्या दिवशी समुद्रमंथनाच्या वेळी संपत्तीची देवी महालक्ष्मीची जन्म झाला आणि दीपावलीच्या दिवसाचे महत्त्व अजून वाढले म्हणून दिवाळीच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा केली जाते.
हा सण जैन व शीख धर्माचे लोक पण साजरा करतात. दिवाळीचे सांस्कृतिक महत्त्व काही वेगळेच आहे . आजकाल हा सण जागतिक पातळीवरही प्रत्येक देशात सुंदररीत्या साजरा केला जातो.
दिवाळी म्हणजे फराळाची रेलचे रांगोळी मिठाई फटाके घराची स्वच्छता सजावट म्हणजे दीपमाला आणि स्वच्छतेने आपली घर नाविन्य रूप घेतात. घरोघरी तुपाचे आणि तेलाचे सुवास दरवळतात. महाराष्ट्रातला फराळ म्हणजे करंजी , चकली , अनारसे , चिवडा , चिरोटे , साठोरी , शंकरपाळी वगैरे वगैरे....
हे सर्व फराळ चविष्ट आणि खुसखुशीत बनवण्यासाठी खालील दिलेल्या टिप्स प्रयोगात आणून पहा. , पदार्थ नक्कीच जास्त खमंग खुसखुशीत बनतील
१) खुसखुशीत आणि कमी तेलासाठी चकलीचे भाजणी चे उकड तयार करा. उकळलेल्या पाण्यात तीळ ओवा हिंग तिखट मीठ बरोबर दीड चमचा लोणी घाला चकल्या अतिशय खुसखुशीत बनतील , तेलही कमी लागेल.
२) नमकीन शंकरपाळे किंवा मठरी बनवताना दोन वाटी मैदा अर्धी वाटी रवा एक वाटी कणीक आणि अर्धी वाटी थालीपीठाची भाजणी वापरावी नमकीन शंकरपाळे किंवा मठरी जास्त चविष्ट बनते.
३) करंजीची वरची पारी बनवताना एक वाटी मैदा, अर्धी वाटी रवा , मुठ बंद मोहन आणि एक चमचा कॉर्नफ्लोअर घालावा म्हणजे करंजी चे कव्हर खमंग खुसखुशीत बनते.
४) करंजीचे सारण बनवताना त्यात खव्याच्या ऐवजी सुक्या खोबऱ्याबरोबर मिल्क पावडर वापरून पहा , सारणाची चव वेगळी लागेल.
५) साठोरीचा कव्हर साठी सुद्धा मैद्याबरोबर एक चमचा कॉर्नफ्लोअर घालून पहा खुसखुशीतपणा वाढेल.
दिवाळीत आपले हे फराळ घरोघरी बनतच त्याशिवाय या फराळाबरोबर दोन ओल्या पदार्थांची रेसिपी देत आहे. या पदार्थांनी दिवाळीचा आनंद काही औरच राहणार.
कांजी वडा -
साहित्य - अर्धा वाटी उडद डाळ , एक वाटी मूग डाळ , तीन चमचे वाटलेली मोहरी , एक चमचा सेंधा मीठ , पाव चमचा हळद , एक चमचा तिखट , पाव चमचा हिंग दोन कप तेल.
सामग्री
कांजी तयार करण्यासाठी लागणारे सामान, पाणी, मिठ, हिंग, हळद, तिखट, पिवळी सरसो, मोहरीचे तेल.
वड़े तयार करण्यासाठी हवी आहे मुगाची डाळ, मीठ, सरसो तेल.
कांजी तयार करणे
सर्वात आधी कांजी तयार करा. या साठी काचेची बर्णी किंवा प्लास्टिकचे कंटेनर घ्या. यात सर्व मसाले यथा मीठ, हिंग, हळद, लाल तिखट, पिवळी सरसो, मोहरीचे तेल घाला आणि मग पाणी घाला. या बर्णीला काही दिवसांसाठी उन्हात ठेवा.
साधारणपणे तीन दिवसात पण उन कमी असल्यास दहा ते सात दिवसात तयार होते. रोज स्वच्छ आणि कोरड्या चमच्याने दिवसातून एकदा हलवा. कांजी तयार झाली आहे कि नाही, हे बघण्यासाठी चव बघा, आंबट झाली असेल, तर कांजी तयार आहे.
वड्यासाठी दोन्ही डाळी चार-पाच तास भिजत घाला आणि मिक्सर मधून काढ़ा. खूप बारीक नका करु. मग मिठ आणि चवीनुसार मसाले घालून लहान आकाराचे वडे तळा.
सर्व्ह कसे करावे
तयार कांजी ग्लास मध्ये ओतून त्यात वड़े, थोड़ी खारी बुंदी, पुदीन्याची पाने, हिरवी कोथिंबीर घालावी आणि द्यावे.
दही वडा -
एक वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ पाच-सहा तास भिजवून ठेवावी , मिक्सर मधून बारीक वाटून त्याला पाच मिनिटं फेटावे त्यात अर्धा इंच आल्याचा तुकडा बारीक वाटून घालावा , अर्धा चमचा जिरं , मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. लहान आकाराचे वडे तेलात तळावे. तळून त्यांना कोमट, मीठ घातलेल्या पाण्यात घालावे. साधारणपणे पंधरा-वीस मिनिटांनी वड्यांना दाबून फेटलेल्या दह्यात घालावे. दोन वाटी फेटलेल्या दह्यात सेंधा नमक भाजलेले जिरेपूड साधं मीठ घालावं त्याच्यात वडे बुडवावे. वड्यांवर हिरवी चटणी चिंचेची चटणी शिरपूर मिरपूड आणि डाळिंबाचे दाणे सजवावे.
या दिवाळीत हे दोन्ही पदार्थ नक्की बनवा. आपल्या फराळाबरोबर या दोन पदार्थांनी दिवाळीचा आनंद द्विगुणित होणार. आपण सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार!
डॉ. वसुधा गाडगीळ , इंदूर.