• 19 September 2023

    आपली लघुकथा

    थेंब

    5 263

    आपली लघुकथा

    हिंदी भाषेतील सुप्रसिद्ध विधा "लघुकथा" मराठी भाषांतर स्वरुपात आपल्या भेटीला येणार. डॉ. वसुधा गाडगीळ आणि अंतरा करवड़े, यांच्या "भाषा सखी" उपक्रमातून हिंदीतील लघुकथा विधेला मराठी भाषेतून आणण्याच्या उपक्रमातील हा एक भाग आहे.

    तर चला, सोबतीने रसग्रहण करुया या विधेचे, आनंद घेऊया विविध कथानकांचे आणि कमी शब्दात अद्भुत अभिव्यक्तिकौशल असलेल्या या साहित्यिक प्रकाराचे सौन्दर्यसाक्षी होऊया. तर चला वाचूया, साद घालत आहे... आपली लघुकथा

    थेंब

    "आई, मी सन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे."

    शिरीषला आपल्या या वाक्यासोबतच घरात एखादा स्फोट होणार असली अपेक्षा होती.

    "कधी निघायचं ठरवलं आहे मग?"

    आईचा प्रतिप्रश्न शिरीष साठी अनपेक्षितच होता. त्याने कितीतरी विचार करुन ठेवले होते मनात, आई रडापडी करेल, कुटुंबाच्या बाकी सदस्यांसमोर मला काहीबाही बोलेल, आपल्या ममतेचा पदर पसरेल... पण ती तर ठामपणे उभी राहिली.

    "अं अगं ते काही दिवसात कळेल, आश्रमातली प्रक्रिया सुरु होणार आहे एक दोन दिवसात." शिरीष महत्प्रयासाने कसेतरी हे उत्तर देऊ शकला होता.

    त्यावेळेस आईच होती फक्त घरात, बाबा आणि दादा घरी आल्यानंतर सुद्धा, शिरीष आपल्या खोलीत बसून एखाद्या तूफानाची वाट बघत बसला. घोर आश्चर्य, आईने त्या दोघांना याबद्दल काहीच सांगितले नाही.

    असेच काही दिवस गेल्यानंतर शिरीषची आश्रमात जाण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. त्याच्या जाण्याच्या तयारीत सुद्धा आई तसेच सर्व काही करत होती जेव्हां तो मित्रांसोबत एखाद्या ट्रिपवर जात असायचा. तिना बाबा आणि दादालाही हे सांगितले, कि शिरीष एक धार्मिक यात्रा करायला जात आहे, त्याला काही अनुभव घ्यायचे आहे. आणि खरं तर शिरीष आईला हे असं काही म्हणण्यापासून थांबवू सुद्धा शकला नाही.

    एक महिना आश्रमात घालवल्यानंतर शिरीष आज एकदा पुन्हा आईसमोर बसला होता. थकलेला, खंगलेला. आश्रमाचे कठोर दिनक्रम आणि संवेदनाशून्य व्यवहारामुळे तो खूप खचला होता. त्याने आपला निर्णय बदलला होता.

    "तू मला थांबवले कां नाही?" शिरीषचा राग, हताशा, संभ्रम सर्व काही या वाक्यात मिसळले होते.

    "जेव्हां मी तुला या मार्गावर जाण्यासाठीच कधी प्रवृत्त केले नव्हते, तर थांबवण्याचा मला काय अधिकार? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, काहीतरी वेगळं हवंय, या शोधात, अशी दवंडी पिटून शरीर जात असेल, पण मन कधीही अशाप्रकारे सन्यासमार्गावर जात नसतं."

    बाहेर थेंब पडू लागले होते, आई त्वरेने उठून बाहेर वाळात घातलेले कपड़े उचलायला निघून गेली.

    शिरीषला माहीत आहे, आईला पाऊस अजिबात आवडत नाही, तिला पावसाचा किती वैताग आहे, पण आता ती वैतागाच्या पलीकड़े निघून जात असते, त्यातही सहज होत असते. तो पण पळत आईला मदत करण्यास तिच्या मागे गेला. थेंब जोरात पडत होते... खूप जोरात आणि शिरीषच्या मनातले मळभ स्वच्छ होत चालले होते.

    त्याच्या लक्षात आले, कि स्वत:चे मन जिंकून जीवनाला हरवणारे कितीतरी मूक सन्यासी आपल्या जवळपास सहज जगत असतात.

    -अंतरा करवड़े

    हिंदी लघुकथेबद्दल

    "बूंदें" या नावाने हिंदीत असलेली ही लघुकथा मुख्यत्वाने पालक आणि मुलांच्या नात्याची वीण आणिक घट्ट कशी करता येणार या उद्देशाने आकारली गेली. आधाराशिवाय दाखवलेला धीटपणा, हा अनुभवशील धैर्यासमोर टिकत नसतो. पण ते धैर्य कमावण्यासाठी निरंतर जीवनतप केल्याने मिळवलेला खंबीरपणा सोबतीला असावा लागतो.



    अंतरा करवड़े


Your Rating
blank-star-rating
Shridhar Bedekar - (24 September 2023) 5
मर्म स्पर्शी कथा 🙏

0 0

Maya Mahajan - (22 September 2023) 5
अनुभव हाच खरा गुरू.

0 0

Kalpana Kulkarni - (21 September 2023) 5

1 0

स्वाती दांडेकर - (21 September 2023) 5
खूप छान.

1 0

ऋचा दीपक कर्पे - (20 September 2023) 5
खूप मोलाची शिकवण मोजक्या शब्दात देणारी सशक्त लघुकथा!

1 0

तनुजा प्रधान - (20 September 2023) 5
अप्रतिम कथा! इतकी सुंदर कथा मराठीत अनुवादित केल्याबद्दल खूप धन्यवाद! केवळ मुलांचे व पालकांचे नाते उद्बोधित करणारी ही कथा नव्हे तर जीवनाविषयी, मनाविषयी, सन्यस्थ वृत्तिविषयी बरेच काही सांगणारी कथा आहे.

1 0

View More