• 10 June 2023

    सेल्फ केअर

    लर्न फ्रॉम एक्सपिरियंस

    5 85

    "आर्यन, झालं की नाही तुझं आवरून? उशीर होत आहे आपल्याला.", असं म्हणतच शिला आर्यनच्या खोलीत आल्या.
    आर्यन खिडकीजवळ बसून टेबलवर असलेल्या त्या फोटोंकडे एकटक बघत होता. आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं.

    त्याची अवस्था बघून शिलाला सुद्धा भरून आलं. आणि चार वर्षांपूर्वीचा आर्यन समोर उभा राहिला. पडलेले खांदे, रडवेला चेहरा आणि कोलमडून गेलेलं मन अशा अवस्थेतच आर्यन पीजी मधून घरी आला होता.

    स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी शक्य ते प्रयत्न आर्यन करत होता. त्यासाठी तो वाट्टेल ते कष्टही घेत होता.
    पण एकामागे एक संकटांची मालिका सुरू झाली. आणि कुठेतरी आर्यनचा आत्मविश्वास डळमळीत झाला.

    शीला आणि रमेश मात्र ह्या काळात खंबीरपणे त्याच्या पाठीमागे उभे राहिले. रमेशची त्याच्या बिझनेस मध्ये पैसे गुंतवण्याची तयारी असूनही आर्यनने त्याला नकार दिला.

    नकार देताना आर्यनने त्या दोघांनाही सांगितलं की , "माझ्या बुद्धिमत्तेच्या आणि कष्टाच्या जोरावर मला काही तरी करून दाखवायचे आहे. जर ह्या वेळीही मला यश मिळालं नाही तर मी नक्की तुमची मदत घेईन. पण मला पुन्हा एकदा प्रयत्न करून बघू द्या. "
    त्या दोघांनाही आर्यन ला पुन्हा उभं राहिलेलं बघायचं होतंच. त्यामुळे त्यांनी त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याची साथ द्यायचे ठरवले.

    आणि रात्रंदिवस एक करून आर्यन ने घेतलेल्या कष्टाचं चीज झालं. त्याचा बिझनेस हळूहळू का होईना मार्गी लागला.

    पण म्हणतात न, पडत्या काळात आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांपैकी कोण आपले खरे हितचिंतक आहेत हे लक्षात येतं. आर्यन ही काही वेगळा नव्हता. त्यानेही हा अनुभव घेतला.

    आयुष्याच्या शाळेने त्याला असे काही अनुभव दिले की तो त्यातून तावून सुलाखून बाहेर पडला.

    आणि आजच तो दिवस होता, आर्यनला एके ठिकाणी तरुण मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं होते.

    मागे वळून पाहताना आज आर्यन ला जाणवलं होतं की अनुभव नावाचा हा गुरू त्याचं आयुष्य किती समृद्ध करून गेला होता.

    आर्यन ने तर घेतला होता त्याच्या अनुभवातून योग्य तो धडा म्हणून तर त्याच्या प्रयत्नांना यश मिळालं. पण आपण त्या दृष्टिकोनातून लक्ष देतो का?

    वाचक मित्रमैत्रिणींनो , प्रत्येक अनुभव मग तो चांगला असो किंवा वाईट आपल्याला काही तरी शिकवत असतो.

    आणि जोपर्यंत आपण त्या अनुभवातून योग्य तो धडा घेत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याच त्याच पद्धतीचे अनुभव येतात.
    नकळतच आपण म्हणतो ना की सारखं सारखं हे असच माझ्यासोबत का घडतं?

    तर ती नियतीची योजना असते आपण त्या अनुभवातून योग्य तो धडा घेत #स्वतःला_घडवण्यासाठी.
    अशावेळी खाली दिलेला सुविचार लक्षात ठेवायचा...

    Don't be afraid to start over. This time you're not starting from scratch, you are starting from experience.



    गौरी हर्षल


Your Rating
blank-star-rating
Neha Khedkar - (12 June 2023) 5

1 0

Manjiri Ansingkar - (12 June 2023) 5

1 0

Seema Puranik - (12 June 2023) 5
खूप छान लिहिले आहे पण "खाली दिलेला सुविचार" आलाच नाही .

1 1

Jayant Kulkarni - (11 June 2023) 5

1 0

Rupali Musale - (11 June 2023) 5

1 0