• 01 November 2023

    आपली लघुकथा

    संगम

    5 108

    आपली लघुकथा

    दसरा आणि दिवाळीच्या मधला काळ नेहेमीच एखाद्या संधिकाळासारखा मनाला हुलकावणी देणारा ठरतो. जुन्या आठवणी, नवीन बंध, जीवनातील नवनवीन घडामोडींमुळे काहीसे थबकलेले मन आणि हळुवारपणे हिवाळ्याच्या कुशीत शिरत असलेले शरीर काहीसे बदल स्वीकारण्यासाठी सज्ज असते. एखादा संगम, एखादी अनुभूती, नवीन दृष्टी ही या काळात लाभलेली शुभ असते असे म्हणतात!

    दिवाळीच्या शुभेच्छांसह, एक परंपरांना जपण्याची वेगळी वाट दाखवणारी रचना वाचून बघूया का!

    संगम

    महानगरात नव्याने आलेल्या अभिला बंगल्यातील वृद्ध जोडप्याची जीवनशैली अतिशय विचित्र वाटली. दर महिन्याला तीन ते चार परप्रांतीय येऊन आठवडाभर त्यांच्याकडे राहायचे. त्या काळी कधी घरात रांगोळी आणि दिव्यांची सजावट असायची, विविध पक्वानांचा सुगंध दरवळत असायचा, प्रार्थना व्हायची, पूजन आणि अनुष्ठान होत असे, केळीच्या पानांवर जेवण दिले जायचे, कधी बाहेर झेंडे लावले जायचे, सगळा बंगला भजन कीर्तन, मंत्रोच्चाराने भरून जायचा.

    मग अचानक परदेशी निघून जायचे आणि पती-पत्नी दोघेही आपापल्या दैनंदिन जीवनात परतायचे.

    एके दिवशी प्लंबरचा नंबर हवा, या मदतीच्या बहाण्याने अभिने मनातील उत्सुकता त्यांच्यासमोर व्यक्त केली.

    त्याच्या या प्रश्नावर दोघांच्याही मुखावर समाधानाचे हसू पसरले.

    "आम्ही आमच्या एकुलत्या एक मुलाच्या कुटुंबासोबत कायमस्वरूपी परदेशात राहत होतो. सर्व काही ठीक चालले होते. पण अचानक एके दिवशी आमच्या नातवाने धर्म बदलण्याची इच्छा व्यक्त केली. त्याच्या कोणत्याही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर, आपल्या धर्म आणि संस्कृतीच्या वैशिष्ट्याच्या माहितीच्या दृष्टीने, आमच्यापैकी कोणाकडेच नव्हते. आम्ही आमच्या नातवाकडून सहा महिन्यांचा वेळ घेतला, भारतात आलो, स्वतःला तयार केले. त्याच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्याचे समाधान केले आणि त्याने आपले मत बदलले.

    खरे सांगायचे तर, आपली परंपरा आणि संस्कृती इतक्या जवळून जाणून घेतल्यावर आमचे विचार देखील बदलले. आता आम्ही एका संस्थेसाठी काम करतो, जी परदेशी लोकांना भारतीय संस्कृती शिकवते. दर महिन्याला आम्ही एका परदेशी कुटुंबाची मेजवानी करतो आणि त्यांना आमच्या भारतीयत्वाची ओळख करून देतो."

    दोघांच्याही चेहऱ्यावर अपार समाधान होते. आत्मिक आनंदाने अभि पुढे आला आणि सरळ त्यांच्या पाया पडला. वैविध्यपूर्ण असलेल्या या वैचारिक संगमात न्हाऊन निघण्याचे पुण्य अकल्पनीय होते.

    - अंतरा करवड़े

    हिंदी लघुकथेविषयी

    ’संगम’ या नावानेच हिंदी भाषेत ही लघुकथा काही विड़ंबनात्मक परिस्थितींमुळे लिहिता आली. माहिती अणि ज्ञान यातील फरक जाणून घेणे आणि त्याप्रमाणे जगणे सार्थक करणे आपण सर्वांसाठी किती महत्वाचे आहे, हे दाखवण्याचा एक प्रांजळ प्रयत्न यात आहे. सणासुदीच्या वेळेस आपल्या मनाची ग्राह्यता वाढ़लेली असते, त्यामुळे चिंतन सोपे जाते. आशा करते कि आपल्याला हा मुद्दा आवडेल.

    - अंतरा करवड़े



    अंतरा करवड़े


Your Rating
blank-star-rating
Geeta Gawarikar - (15 November 2023) 5
छान 👌👍

0 0

Smita Bhalme - (14 November 2023) 5

0 0

Kalpana Kulkarni - (06 November 2023) 5

0 0

उज्वला कर्पे - (05 November 2023) 5
खूप छान, मनाला भावली.

0 0

sanjeevani bargal - (05 November 2023) 5
इतका सुंदर विचार आणि तो पटवून देणारी कथा खूप छान.

0 0

ऋचा दीपक कर्पे - (05 November 2023) 5
खूपच छान!

0 0

Nitin Pradhan - (04 November 2023) 5
अतिशय सुंदर आणि विचार करायला लावणारी कथा आहे 👌👌🙏

0 0

View More