• 08 March 2024

    जागतिक महिला दिन

    अर्धांगिनी माझी धिट - सर्वच भुमिकेत फिट

    5 16


    अर्धांगिनी माझी धिट - सर्वच भुमिकेत फिट

    वयाच्या विसाव्या वर्षी थेट जळगाव सारख्या मोठ्या शहरातून १९९० शहापूर सारख्या खेड्यात आमच्या कुटुंबातील सुन म्हणून 'ती' चा प्रवेश झाला. आजकालच्या काळात, 'मी आणि माझा नवरा ' यालाच पसंती आणि प्राधान्य देण्याची नव-दांपत्याची मानसिकता असतांना, घरातील एकत्र कुटुंब पद्धती मध्ये 'ती' ने सहजरीत्या जुळवून घेतले. केवळ गृहीणी न रहाता, 'मुली' समान मानणाऱ्या श्रीमती. जगे मावशी यांच्या प्रेरणेने घरी शिवणकाम सुरू केले. स्वतः अपंग, तीन मुली पैकी एक अपंग, नवऱ्याचे छत्र नसलेल्या, जगे मावशीची प्रेरणा 'धर्म पत्नी' ला मोलाची ठरली. पत्नी, सुन, भावजय, आणि आता सासू या भुमिका अतिशय लिलया निभावत आहे. घरातील सगळ्यांना तर 'ती' ने आपल्या सुस्वभावाने आपलेसे केले आहे, मात्र सामाजिक जीवनात आपले स्थान निर्माण केले आहे. केवळ छंद म्हणून सुरू केलेला 'टेलरिंग' व्यवसाय यशस्वी करीत आजच्या घडीला दोन दुकानांचा कारभार सांभाळत आहे आणि त्यायोगे तीन - चार महिलांना देखील रोजगार उपलब्ध करून दिला आहे. अतिशय मनमिळाऊ स्वभाव, सगळ्या परिस्थितीत जुळवून घेण्याची मानसिकता, तेवढ्याच 'खंबीरपणे' परिस्थितीला सामोरे जाण्याचा खंबीरपणा. एक स्त्री ला परिपूर्णत्वासाठी असलेल्या सर्व गुणांचे मिश्रण 'ती' च्या ओतप्रोत भरलेले. मुलाचे लग्न झाले असले तरी, सुनेला 'ती' जन्मदात्या आई पेक्षा जवळची मैत्रीण वाटते. अशी ती' माझी 'अर्धांगिनी' 'अलका' हिचा मला सार्थ अभिमान आहे आणि कायमच राहिल. आई-वडिलांची मुलगी, पति ची पत्नी, मुलांची आई, सुनांची सासु पेक्षा आईची ममता देणारी, नातवंडांंशी आजीचे नाते जोपासणारी' ती'सर्वच भुमिकेत फिट बसते



    जन्मोजन्मी हाच नवरा मिळवा' म्हणून वटपौर्णिमेला पुजा केली जाते. मात्र जन्मो - जन्मी 'याच' अर्धांगिनी 'चा सहवास लाभावा म्हणून मी ईश्वराकडे प्रार्थना करतो.


    अनंत बोरसे

    ९१५८४९५०३७





    anant borse


Your Rating
blank-star-rating
trupti dev - (09 March 2024) 5

0 0