• 25 August 2024

    भावविश्व

    स्पर्धा.....

    0 142

    सानंद मध्ये पुन्हा समूह गीत स्पर्धेत आनंदीआनंद पसरलामागच्या वर्षी मी सानंद समूह गीत स्पर्धेत सहभागी होणारे अमराठी प्रतिभागी आणि उत्तम व्यवस्थापन बद्दल माहिती दिली होती...

    स्वर-भाषा.... ह्या वर्षी जरा वेगळ्या विषयावर लिहावं अस वाटलं कारण दरवर्षी मिळणारी उत्तमोत्तम समूह गीतांची मेजवानी काही केल्या विसरता येत नाही....

       आनंदे वंदावा गणनायक तो .....

       सरीवर सरी......

      स्वराज्य तोरण चढे गर्जती तोफांचे चौघडे....

      गोऱ्या-गोऱ्या गालावरी चढली....

        सानंद समूह गीत स्पर्धा ऐकणारे ही गाणी नक्कीच कधीच विसरणार नाही...महिन्याभर आधी म्हणजे जून पासून या सुंदर गाण्यांची तयारी सुरू होऊन जाते. स्पर्धेत सहभागी होणारे बालगटातील मुलं असो किंवा तरुण, महाविद्यालयीन विद्यार्थी सगळेच  जमतात स्वर भाषा चे संस्थापक विश्वेश दादा कडे. फक्त लोकमान्य नगरातील मुलं नाहीत जवळच्या कॉलोनी मधली मुलं ही स्वर-भाषेचे नियमित सदस्य आहे. उत्तमोत्तम गाण्यांची निवड, उत्तम व्यवस्थापन मुख्य म्हणजे मुलांसाठी प्रेमळ आणि उर्वरित वातावरण निर्मिती हीच स्वर-भाषेची ताकद असावी. सानंद किंवा मुक्त-संवाद बालनाट्य स्पर्धे ची तयारी सुरू होणार हे कळताच क्षणी लहान मुलांपासून मोठ्यामुलांपर्यंत सगळे विश्वेश दादा कडे जायला अगदी मनापासून आनंदाने सज्ज असतात... आणि विश्वेश दादा कधी मुलांच्या विश्वासाला तडा जाऊ देत नाही..... अर्थातच याच्या मागे सदिच्छा, कठोर परिश्रम आणि समाजासाठी काही उत्तम कामगिरी करण्याची भावना असावी... नेहमीच उत्तम कामगिरी वाजवणारे स्वर-भाषा समुहाचे अभिनंदन.

    आमच्या इंदूर मध्ये लहान मुलांसाठी दोन संस्था "सानंद समूह" आणि "मुक्त संवाद समूह" क्रमशः समूह गीत स्पर्धा आणि बाल नाट्य संमेलन आयोजित करतात 

     मोबाईल, ऑनलाईन गेम्स, टीव्ही, वेब सीरिज पाहणाऱ्या या नवीन पिढीच्या हातात झांजा, तबल्याची थाप, निरनिराळे वाद्य वाजताना पाहणं म्हणजे एक वेगळीच मजा आहे.

    नाटकात गंमतीशीर पात्र करणं, कधीतरी गंभीर भूमिकेतून  उत्तम शिकवण देणारे लहान मुलं पाहाण्यात खूप बरं वाटतं.

     मात्र यावेळी दोन्ही स्पर्धेत कमी स्पर्धक  होते आणि व्यवस्थापकांनी सुद्धा याबद्दल काळजी व्यक्त केली.

    मुलांनाच नाही तर पालकांना मुलांच्या अभ्यासाचा ताण जास्त आहे आणि स्पर्धेसाठी वेळ मिळत नाही अस सांगितलं जातं. मान्य आहे हल्ली मुलांना अभ्यासाचा खूप ताण आहे पण पालकांनी लक्षात घ्यावं की मुलांच्या मनावरचा ताण कमी करण्यासाठी संगीत उत्तम उपाय आहे. परदेशी ताण  कमी करण्यासाठी संगीत उपचार केले जात आहे! आपल्या संस्कृतीत देवांचे भजन, कीर्तन, आरत्या, स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना मध्ये हे सहज मिळत.... घरात हा वारसा जोपासला जातो तर उत्तम पण नाही तर एक सात-आठ दिवसांसाठी मुलांना एक वेगळं उत्तम वातावरण मिळालं तर काय हरकत आहे.

     समाजाला उत्तम वळण देण्याचा प्रयत्न करणाऱ्या संस्थांना येवढं हातभार तर आपण नक्कीच देऊ शकतो.

    आभासी जगात रमणाऱ्या नव्या पिढीला....मंचावरील खरीखुरी स्पर्धा त्याचा रोमांच अनुभवायला द्यायला काय हरकत आहे..

    जिंकले तर उत्तम नाहीतर पुढच्या वर्षी अजून तयारीने परत स्पर्धेचा आनंद त्यांना मिळाला तर काय हरकत आहे .... असो!

    यथा पालक....तथा बालक....

    सौ. मीनल आनंद विद्वांस

    -->

    सानंद मध्ये पुन्हा समूह गीत स्पर्धेत आनंदीआनंद पसरला. मागच्या वर्षी मी सानंद समूह गीत स्पर्धेत सहभागी होणारे अमराठी प्रतिभागी आणि उत्तम व्यवस्थापन बद्दल माहिती दिली होती...

    मीनल विद्वांस

Your Rating
blank-star-rating
Sorry ! No Reviews found!