उद्यान
आमच्या घरासमोर एक मोठ्ठा बगीचा आहे. सध्या तिथे अगदी कोणी ही येत नाही. पाऊस आला की आमच्या बगीच्याचं रुपांतरण सरळ तलावात
होतं पण मी काही बगीच्यात फिरायला जाणं बंद करत नाही... पायवाटेने फिरायला असं वाटतं जणू काही आपण जंगलात
आहोत. पावसाळ्यात झाडं अजून हिरवीगार आणि आल्हादित दिसतात. झाडं अजून उंच दिसतात सगळीकडे विविध वेलींचा अधिपत्य आहे....त्यावर सुंदर रानातील फुलं. मध्ये एक छोटंसं तलाव आणि सगळीकडे कमालीची
शांतता.
आता पावसाळा संपताच थंडी मध्ये उन्हात बसायला कुठे सासूबाई
ह्यांचे समूह तर कधी सुना एकत्र जमतात. बालगोपाल आपापल्या
आई बरोबर नाहीतर मित्रांबरोबर खेळायला सारखे बगीच्यात चकरा मारत असतात. रात्री आपापल्या बेटर-हॉफ बरोबर शतपावली करणारे पुष्कळ जोडपे दिसतात.
उन्हाळ्यात सकाळी सकाळी लवकर येणारे तसेच
संध्याकाळी माहेरवाशिणी बगीच्यात आपल्या जुन्या मैत्रिणींबरोबर गप्पा मारत फिरत असतात. उन्हाळ्यात बगीच्यात तर पाय ठेवायची ही जागा नसते....
हाच सगळ्या विचार करत आज बगीच्यात फिरताना आकाश मोगऱ्याच्या झाडावर नवीन पालवी फुटलेली दिसली..आता कधीही आकाश मोगरा बहरणार ह्या आशेने मी उद्या ही आमच्या बगीच्यात फिरायला जाणार. असो!
प्रिय वाचक हो! तुम्ही पण वाट पहात आहे ना आकाश मोगऱ्याच्या
बहर ची...
सौ.मीनल आनंद विद्वांस