नुकतेच पंतप्रधान या पदासाठी म्हणजे लोकसभा निवडणूक झाल्या..... नातीगोती मध्ये या निवडणुकी चा काय महत्त्व? खरंतर पंतप्रधान या पदावर कार्यरत कोणत्याही व्यक्ती बरोबर काही ही नातं नाही पण आदरणीय श्री नरेंद्र मोदी जींची लार्जर देन लाईफ इमेज असल्याने ते सगळ्यांनाच प्रभावित करतात. असं वाटतं जसे ते घरातले कोणी मोठे आणि खूप समजूतदार आजोबा किंवा बाबा असावे! त्यांचं आपकी बात हे प्रोग्राम असो किंवा ते सभेमध्ये बोलत असो ते सभेतल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर संवाद करतात. असं जाणवतं ते पंतप्रधान होण्याआधी भारताची परिस्थिती आणि ते पंतप्रधान झाल्यावर भारत या दोन्ही परिस्थिती मध्ये खूप मोठा फरक आहे. मोदीजी यांनी जगात एक भारतीय म्हणून खूप मानसन्मान मिळवला. त्यांनी सुरुवात स्वच्छते पासून केली! जागोजागी सुविधा घर बांधावे आणि प्रत्येक घरात एक टॉयलेट असावं अशी सुरुवात करणारा हा जगातला एकमेव प्रधानमंत्री असेल आणि आज जेव्हा त्यांना हवे तेवढे मत मिळत नाही तर फार खेद होतो पण माणसाला चांगल्याची सवय फार लवकर लागते आणि त्याला त्याच्यापेक्षा आणखीन जास्ती चांगलं हवं असतं. सगळं काही मिळाल्यावर अजून काय बाकी आहे? हा सगळ्यात मोठा प्रश्न भारतीय जनतेसमोर असावा.......मोदीजींनी विपरीत परिस्थितीमध्ये असताना भारताला बाहेर काढलं आणि खूप सन्मान आपल्या भारत देशाला मिळवून दिला त्यामुळे त्यांच्याबरोबर एक वेगळच नातं प्रत्येक भारतीयाच्या मनात नक्कीच निर्माण झाला आहे त्यांच्या योजना प्रत्येक भारतीय पर्यंत सहज पोचतात आहे त्यांनी लाडली लक्ष्मी मध्ये पाठवलेले रुपये किंवा शेतकऱ्यांना पाठवलेले पैसे सहज त्यांच्या पर्यंत पोचतात आहे असा पंतप्रधान पाहून मनात आदर युक्त नातं मनात निर्माण झालं आहे. मोदीजी एक असं व्यक्तिमत्व जे आधी कधीही झालं नाही आणि पुढेही होणे शक्य नाही. हेच आजच नातीगोती-८
सौ. मीनल आनंद विद्वांस