आज जेंव्हा मी खोलवर विचार करीत आहे तेव्हा मला समजत आहे कि प्रत्येक संस्कृतीमध्ये काहीतरी रहस्य दडलेले आहे उदाहरणासाठी , आपण दरवर्षी आपला जन्मदिवस केक कापून आणि मेणबत्ती विझवून ख्रिस्ती पद्धतीने साजरा करतो पण या पद्धती मागील गुढ़ नेमकं काय असावे बरे? याचाच विचार करीत मी काल एकटक स्वतःच्याच मनाला प्रश्न करीत होतो. त्यावेळी मला असे समजले कि , एक ना एक दिवस आपण सर्वचजण आपला देह सोडणार आहोत तर मग ते दु:खात सोडायचे कि सुखात हा निर्णय मात्र आपल्यावरच आहे. जन्मदिवसा दिनी आपण केक खावून एन्जॉय करतो जे दर्शवते कि , आपण उरलेले दिवस आनंदात जगले पाहीजेे आणि केक सारखंच आपण इतरांशी गोड बोलले पाहिजे. तर दुसरीकडे आपण केक वरील लावलेल्या मेणबत्त्या विजवतो जे दर्शवते कि, आपल्या आयुष्यातील अजून एक वर्ष कमी झाले आणि आता आपल्याकडे खुपचं कमी वेळ शिल्लक आहे आपली स्वतःची ओळख तयार करायला. तर तिसरी आणि शेवटची गोष्ट म्हणजे त्या दिवशी प्रत्येक व्यक्ती ज्याचा जन्मदिवस आहे तो मेणबत्त्या विझवण्या अगोदर देवाकडे प्रार्थना करतो हे दर्शवते कि, आपल्याला आपल्या पापांची जाणीव झाली आहे आणि म्हणूनच मोक्ष मिळवण्यासाठी आपण देवाकडे याचना करतो, असे मला वाटते. पण जन्मदिवस तर दरवर्षी येतो तरीही त्याची ही बाजू कदाचितच आपल्याला दिसते.