• 10 November 2024

    भावविश्व

    दिवस सरत जातात

    5 53

    आकाश मोगरा बहरून पुष्कळ दिवस झाले पण माझ्या फुलदाणीत अजून एकही फुल मला आणता आलं नाही. नेहमीची असणारी कामं, जिम्मेदारी, मनात असणाऱ्या काळज्या कधी-कधी डोकं वर करून सुंदर आणि आल्हाददायक क्षणांना अनुभवायला विसरायला लावतात...... जगणं सदैव प्रकृतीच्या अनुकूल असावं हे ल‌क्षात आलं नाही तर मनात कुठेतरी जगण्यातील ओढाताण आपल्याला काय सगळ्यांच्या लक्षात येते. दिवस सरत जातात आणि वेळ निघून गेल्यावर कोणत्याचं गोष्टींना काहीच अर्थ नसतो....हे मनात येताच मी हातातील.... मनातील सगळी व्यस्तता एकीकडे सारून परमप्रिय आकाश मोगऱ्याच्या झाडाच्या खाली जाऊन ओंजळीत माझी आवडती फुलं गोळा करून माझ्या फुलदाणीत सजविली.... आकाश मोगरा बहरला आहे पण दिवस सरत जातात.... असो!



    सौ. मीनल विद्वांस


Your Rating
blank-star-rating
SHRIM Features - (19 January 2025) 5

0 0

ऋचा दीपक कर्पे - (11 November 2024) 5
खूप गोड

1 1