• 14 January 2025

    लाखाची गोष्ट

    लाखाची गोष्ट

    0 9

    लाखाची गोष्ट : शुभांगी पासेबंद

    अनेक महत्त्वाच्या गोष्टींना माझी आई,'लाखाची गोष्ट'असं म्हणायची.

    हम न समजे है बात पते की,

    दिल है शीशे का दुनिया पत्थर की!

    अशा बात पतेकी, बात ला लाखाची गोष्ट म्हणतात.खूप जुन गाणं आहे पण वेळप्रसंगी, जखमी माणसाला ते नेहमीच आठवतं, जखमी माणूस स्वतःच्या मनाशी ती कबुली देऊन थोडाफार स्वतःलाच दिलासा देतो . छोट्या छोट्या गोष्टीत भ्रमनिरास होतो.वाईट वाटतं, काही काळ अस्वस्थ वाटतं छातीत धडधडतं, काही करू नये असं वाटतं, तोंडाची चव जाते. आपण अन्यत्र मन रमवायचे प्रयत्न करतो कोणाशी तरी मन मुक्त करतो. रमवतो . पण अचानक आणि ज्यावेळी वाटतं कोणीतरी आपल्याला सहानुभूती दाखवावी,त्यावेळी कुणीतरी टोला हाणत,आपल्या जखमेवर मीठ चोळतं किंवा मुद्दाम नजरेत असे भाव दाखवतो की आपल्याला त्या, जवळच्या व्यक्तींनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिये चा त्रास व्हावा. आपण रडत असताना,काही सांगत असताना समोरची व्यक्ती हसली तरी आपल्याला वाईट वाटतं. आपल्याला असं वाटतं की ही समोरची व्यक्ती आपल्या फजितीला हसते आहे.

    छोटीशी घटना काल घडली,ती सांगते. 'वडापाव खाता खाता', तांदूळ निवडता निवडता, चालता बोलता, बागेत बसता बसता,फोन करता करता, असं काहीतरी लिखाण करावे,अशी माझी शैली नाही, पण सांगते.

    एका शिबिराला नाव नोंदवायचं होतं. मी तो बॅनर मधला, फोन नंबर सेव्ह करून घेतला. माणसं बिझी असतात, म्हणून फोन करायचे ऐवजी मेसेज टाकला. माझं नाव शिबिराला नोंदवा,म्हणून माझी डिटेल्स आणि नंबर कळवला ! नाव नोंदवलं असं त्या नंबर वाल्यानी उत्तर दिला. त्यानंतर मी विचारलं दिवसभर शिबिर आहे, डबा आणायचा का? त्यावर त्यांनी उत्तर दिलं, " हो आणा की!फक्त तुमच्यासाठी पण नाही,माझ्यासाठी पण आणा."

    मी त्यावर विचारले,

    "पाण्याची सोय आहे, का पाणी पण आणायचं?" त्यावर त्यांनी उत्तर दिले,

    "पाणी पण आणा आणि कोल्ड्रिंक वगैरे आणा . शिबीर भाषण,दिवसभर आहे, चहा तिथे राहणार,थोडेसे तोंडात टाकायला, बिस्कीट आणा."

    त्यावरून मी समजले की माझी नोंदणी झाली आहे. माझ्यासोबत नोंदणी केलेल्या, दोन जणांना नोंदणी झाली आहे,आणि बाकी अर्जदारांना परवानगी नाही,असा मेसेज आला.मला मात्र आला नाही.मग मला प्रश्न पडला,काय झालं असावं? संपर्क केला असता,त्या आयोजकानी सांगितलं,"नोंदणी फुल झाली तुम्ही नोंदणी केलेली नाही,तुमचं नाव शिबिरार्थी च्या यादीमध्ये नाही." मग मी ह्या पहिल्या व्यक्तीशी ज्याच्याशी मी एसएमएस वर बोलत होते त्याला फोन केला तो म्हणाला, "मैने तो प्रँक किया, ये रॉंग नंबर है!"

    आणि नोंदणी फुल झाल्यामुळे माझी नोंदणी होऊ शकली नाही. मला वाईट वाटलं. मागच्यावेळी परगावी,जेव्हा हे असं, प्रशिक्षण शिबिर झालं, माझा मुलगा अचानक परगावाहून आल्यामुळे मी त्या शिबिराला जाऊ शकले नव्हते.तिकीट काढली होती तरी कॅन्सल केली. ते शिबीर तर तीन दिवसाच होत. अतिशय सुंदर रित्या झालं.आलेल्या शिबिरार्थींना आजूबाजूची पर्यटन स्थळ दाखवण्यात आली आणि त्या विद्यापीठाचा परिसर देखील निसर्गरम्य होता.ते शिबीर चुकल्यामुळे आता मी म्हटलं, आता जे एक दिवसीय आहे,ते कानावर तर पडेल, समजेल,निदान आपण जे शिकलो,त्याच रिविजन होते. पण ह्या शिबिरात विनंती करून देखील,आधी नाव न नोंदवलेल्या नव्या शिबिरार्थींना (मला), आयोजकांनी, आधी परवानगी दिली नाही.म्हणजे थोडक्यात काय सगळ्यात पहिल्यांदा मी नाव नोंदवून सुद्धा,माझ्या नशिबी ते पूर्णवेळ शिबीर नव्हतं.

    त्यावरून जुनी गोष्ट आठवली 40 वर्षांपूर्वीची! त्याकाळी स्थळ सांगून आलं,की मुलगी दाखवायला, त्या गावी जायची पद्धत होती. मला माझ्या बहिणीकडे पुण्याला नेण्यात आलं. त्या बहिणीच्या घरापासून जेमतेम चार बंगले दूरवर, त्या आलेल्या प्रस्तावाच, 'वर' असलेल्या मुलाच घर होतं.तो मुलगा आर्मीत होता. केवळ आठ दिवस रजा काढून आला होता. आम्ही तिथे पोहोचलो आणि पहिल्या दिवशी मला दाखवायची तयारी झाली आणि माझ्या पोटात खूप दुखायला लागलं. वडिलांनी, त्या लोकांना उद्या येऊ असं सांगितलं.तो मुलगा फक्त आठ दिवसासाठी आल्यामुळे,तो बऱ्याच मुली बघत होता. अशा रीतीने सात दिवस मला उलट्या आणि जुलाब होत होते. सात दिवसांनी तो मुलगा रजा संपून सिलिगुडी ला परत गेला. (तिथे त्याच आर्मी पोस्टिंग होतं.) पूर्वीच्या काळी आत्तासारखी, रजा मिळायची नाही.इन्फ्रास्ट्रक्चर एवढे डेव्हलप नव्हतं,त्यामुळे कोणीही सहज भेटणं, सोपं नव्हतं. पुण्यातच कोणत्या,या टोकावरून त्या टोकाला भेटायला जाणे पण सोपं नव्हतं. त्यामुळे त्या आठ दिवसाच्या माझ्या आजारपणामुळे, चार बंगले जवळ राहत,असलेल्या व्यक्तीला सुद्धा मी भेटू शकलो नाही. योग नव्हते किंवा विधीलिखित होतं.

    "तुम्हारे बिन कोई दिलकश नजारा हम ना देखेंगे," असं म्हणणारी माणसं,वेगळेवेगळे नजारे बघत फिरतात. आणि आपण मात्र,

    "और हम खडे खडे निर नयन मे भरे ,

    उम्र की चढाव का उतार देखते रहे!"असे म्हणून गप्प बसतो.

    मागे एकदा असाच, महाबळेश्वरला साहित्य कार्यक्रम झालेला असताना, बहीण तिथून जवळ राहते,म्हणून आम्हाला जाणं सहज साध्य होतं. पण त्या आयोजकांनी,"तुमची कविता योग्य नाही,"म्हणून आम्हाला निवडलंच नाही. शेवटपर्यंत त्यांनी आम्हाला त्या संमेलनाला येऊ दिलं नाही. तर ते आयोजक, त्या बाई माझ्या बहिणीकडे पूर्वी कामानिमित्त आलेल्या असताना, एक रात्र राहून, जेवून खाऊन, गेल्या होत्या.,पण त्यांनी आमच्या कविता न निवडल्याने, आम्ही खट्टू झालो.फोन वर "प्रेक्षक म्हणून या" असं म्हणत होत्या. मुंबईहून प्रवास करून, पैसे खर्च करून ,महाबळेश्वरला जाऊन, कवी संमेलनासाठी प्रेक्षक बनणं,व्यवहार्य नव्हतं.अशा बऱ्याच संधी हातातून निसटून जातात.

    संधी का जातात ते काही कळतच नाही.वाटतं,ही काही लोक, मुद्दामच आपल्याला टाळतात का?आपल्याला नकळत दुखावण्याचा प्रयत्न करतात?की आपल्या प्रगतीमुळे त्यांना त्रास होत असतो?

    सूड फक्त चित्रपटातच यशस्वी होत असतो.

    माझ्या एका मैत्रिणीचा काही कारणाने वाद झाल्यावर, ती प्रतिस्पर्ध्याला म्हणाली की तुझ्याच दुकानाच्या शेजारी मी दुकान काढेल आणि चालवेल. पण जमलं नाही.

    सरफरोश चित्रपट आपल्याला सगळ्यांना आठवत असेल, पण त्या सर्फरोशची थीम फार थोड्या लोकांना आठवते. अमीर खानच्या वडिलांवर हल्ला झालेला असतो. आणि पोलीसानी मारेकर्‍याला शोधावे या कारणाने अमीर खान पोलीस स्टेशनवर पोरगेला असताना पासून जात असतो. सांगतो, " की माझ्या वडिलांवर कोणी हल्ला केला शोधा. "शेवटी पोलीस त्याला गचांडी धरून,पोलीस स्टेशनच्या बाहेर फेकून देतात.

    त्यानंतर आमिर खान नायक खट्टू दाखवलाय, तो परत कधीही त्या पोलीस स्टेशनवर जात नाही.पण एसीपी बनतो आणि एसीपी बनल्यावर त्या पोलीस स्टेशनला जातो. अशी ध्येय,बरीच माणसं सूडबुद्धीने किंवा बदला घ्यायचा म्हणून ठेवतात. उदाहरणार्थ एका अमिताभ बच्चनच्या चित्रपटात तो म्हणतो,"मुझे ये पूरी की पूरी इमारत खरीदनी है क्यूकी मेरी मा ने यहा इटे उठाइ हैं."हे असं कहाण्यांमध्ये घडत.पण ते सगळ्यांना शक्य असतं असं नाही ते चित्रपट असतात म्हणून तो बदला घेणं शक्य होतं. प्रत्यक्षात अनेक अपमान अनेक हातातून सुटून गेलेल्या संधी, मनावरची ओरखड, मागे पडलेली घर बिघडलेली नाती हैराण करत राहतात.

    कोणताही सूड घ्यायचा ध्येय धोरण सुद्धा सोप्पं नसतं. त्याच्यापेक्षा आपणच आपले चांगलं होऊ दे अशी प्रार्थना देवाला करावी. सांगण सुपर सोपं असतं पण अंमल करण्यासाठी ते अवघड असतं.

    दिल है शीशे का दुनिया पत्थर की!

    **



    Shubhangi Paseband


Your Rating
blank-star-rating
Sorry ! No Reviews found!