नवोपक्रम स्पर्धेत ना.बा. भारती यांचा नांदेड जिल्ह्यात द्वितीय क्रमांक .
सन 2024 25 साठी घेण्यात आलेल्या माध्यमिक शिक्षक नवोपक्रम स्पर्धेत श्री समर्थ विद्यालय पिंपरखेड येथील शिक्षक श्री ना .बा . भारती यांनी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी "विद्यार्थी आणि सायबर सुरक्षा" हा नवोपक्रम शाळेमध्ये घेऊन, एससीआरटीकडे सादर केला होता . नांदेड डायटच्या समीक्षण समितीने यांच्या नवोक्रमास द्वितीय क्रमांक दिलेला आहे .ना. बा. भारती यांनी 11 पुस्तके लिहिली असून त्यात चला मुलानो गीत गाऊया,, कृत्रिम बुद्धीमता आणि शिक्षण, भारतातील बदलत्या शिक्षणाचा वेध , सकारात्मक विचारांचा विजय, शाश्वत विकास व्यावसायिक टप्पे. , 50 शब्दांसाठी 2500 सुविचार , चला मुलांनो गीत गाऊ या, माझी यशस्वी स्विंग ट्रेडिंग ,तंत्रस्नेही शिक्षक, शिक्षण विश्वाचा गुरु . आधुनिक शैक्षणिक मानसशास्त्र यांचा समावेश आहे. यूट्यूब वर 2000 विडियो असून ,ब्लॉग ही आहे. विविध जर्नल प्रकाशित झाले असून ,साधन व्यक्ती म्हणून ही कार्य केले आहे.
याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुदर्शन भारती , शाळेचे मुख्याध्यापक एस. एल .सूर्यवंशी .पी व्ही राऊत , अमोल मोरे , नंदकिशोर जगताप , निकेतन भारती , रवी वायकुळे , दिक्कतवार दाक्षायणी , दुर्गेश कुंभकर्ण , निलेवार के. एस. आणि विद्यार्थ्यांनी त्यांचा सत्कार केला .