• 27 January 2025

    टीचरस इफेक्ट लास्ट...

    टीचरस इफेक्ट लास्ट...

    0 24

    टीचरस इफेक्ट लास्ट...


    स्कूल, काॅलेजातील दिवस फार अलौकिक काळ असतो. भविष्यातील स्वप्नात आपण कसे असू याचा थांगपत्ता नसतो. पण त्या वयातला उत्साह हा फार गतिमान असल्याने बेफिकीर वागणे, सगळे काही माहिती आहे असे ढोबळ वर्तन सगळ्याचे असते.

    आता माझ्या बरोबरच असलेले चाळीशी जवळ आलेले सारेजण व्यवस्थित सेटल आहेत. सोशल मीडियामुळे संपर्क साधून चौकशी करतात पण कायम एक निराशेचा सूर प्रत्येकामध्ये आढळून येतो.

    खरतर नकली गोष्टीत जीव इतका गुंतवून त्याचे समाधान मानावे की नाही हा प्रश्न त्यांना सतत भिडतो आहे हे प्रकर्षाने जाणवते...

    मला अशावेळी माझ्या हाय स्कूल इंग्लिश टीचर Maria Desouza यांची आठवण येते. त्या अनेकदा दोन वाक्ये लिहीत असत जेव्हा अभ्यासाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष नसे, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही निवडा पण काळजी घ्या हे पुढे येणार्‍या आयुष्यात अनेक प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा मार्ग आहे.

    1) EAT TO LIVE.

    2) LIVE TO EAT.

    अशी ही कोडी म्हणजे त्याकाळी बनवाबनवी वाटायची;

    सगळे डोक्यावरून जायचे. आता यातले गमक उलगडते.

    चार भिंतींच्या बाहेर पडलो की अनेक ठिकाणी असे प्रसंग येतात जिथे सामोरे जाण्याची क्षमता उपयोगी पडते. आजच्या घडीला आपल्या सोयी आणि सुखसोयी यातला फरक लक्षांत घेऊन येणार्‍या पिढीने त्याचे अवलोकन केल्यास किती फायदेशीर ठरेल?

    आज 25 व्या वर्षी मिळालेले यश 40शी पर्यंत टिकवण्यासाठी टप्याटप्याने उंचावत जाताना जगण्यासाठी ध्येय आवश्यक आहे. एखाद्या ध्येयाचा मोह कितपत करावा आपण ठरवावे. आपलीच ध्येये अतिरेकी वाटत असतील तर थोडा फेरविचार करावा.अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. मार्गदर्शन हे सर्व स्तरांवर उपयुक्त ठरते. असली आणि नकली मुद्यावर सुचलेले....


    असली या नकली?


    माझ स्वप्न होत की,

    अस्सल चिरेबंदी घर असावं ?

    आज बंगला आहे पण...

    का बरं त्यात चिमूटभर सुख नसावं?


    लहानपणी फिरायला जाताना,

    बसची वाट बघत होतो?

    आज गाडी दारात पडून असते ,

    पण फिरायला वेळच नसतो.


    बालपणी गोडाचा बेत,

    म्हणजे पाहुणे येणार घरी...

    आज पुरणपोळी असते जेवणासोबत

    पण घरचे नसतात पंगतीवरती?


    कितीही मोठे झालो तरी,

    गेलेला काळ परत आला नाही ?

    जग जिंकत गेलो आपण

    पण वेळ आपल्यासाठी थांबली नाही?


    काहीतरी मिळवण म्हणजेज सुखी आयुष्य,

    असे मानत जगू नका....

    येणारा प्रत्येक क्षण जगा ...ते तुम्हीच ठरवा...

    असली या नकली?


    ✍सौ. चंद्रलेखा धैर्यशील जगदाळे

    करियर कोच



    सौ. चंद्रलेखा धैर्यशील जगदाळे


Your Rating
blank-star-rating
Sorry ! No Reviews found!