“एकटी”
“आजी सगळ्यांना असं का वाटतंय की मी लग्न करावं? तुच सांग का बरं मी लग्न करावं! मी जगण्यासाठी कोणावरही अवलंबून नाही, चांगल कमावते, आनंदाने रहाते मग का बरं मी येवढा मोठ्ठा घाट घालावा? आजोबा तर आईच्या लहानपणीचं वारले पण तु सगळ अगदी उत्तम रित्या संभाळल ना? मी आईला सांगून आले आहे की मी लग्न करणार नाही.” आभा एका सुरात मंगला ला तिच्या आजीला म्हणाली.
आजी सगळ शांतपणे ऐकत आहे! नक्कीच आईने घरी झालेलं माझं आणि तिचं भांडण आजीला मी यायच्या आधी सांगितलं असावं...असो! एकदा आजीच्या लक्षात आलं तर आईला समजावणं फार सोपं होईल. मनात हाच विचार करून आभा सरळ आजीकडे निघून आली.
“ तु सुट्टी घेतली आहे की ऑनलाईन तुझा ऑफिस सुरू आहे?” आजी ने विचारलं.
“आजी ऑनलाईन ऑफिस सुरू आहे.”
“मग चल पटकन हातपाय धुवून घे आपण लवकर जेवून आईस्क्रीम खायला जाऊया. पुष्कळ दिवसात मी बाहेर जाऊन आईस्क्रीम खाल्लं नाही!”
“हे काय! मी काय बोलतेय आणि तु काय उत्तर देत आहे?”
“अगं आपण आरामात बसून बोलुया! आता पटकन आटोप.”
“ठिक!” आम्ही दोघीही मस्त पैकी जेवलो आणि आईस्क्रीम खायला निघालो.
आजीने नेहमी प्रमाणे तिचा आवडता केसर पिस्ता आणि मी अमेरीकन नट्स.
“अजून हवं आहे का!”
“हो?”
“पण मी पैसे देणार नाही हं! मी माझ्या कमावत्या नाती बरोबर आईस्क्रीम खायला आले आहे!”
“हो गं आजी पैसे मी देणार!”
आईस्क्रीम खाऊन आम्ही बाहेर निघालो अचानक समोरून एक कार आली आणि आमच्यावर आदळली.
“ आजी! ऐ आजी! उठ ना!....आपण आता लवकर घरी जाऊ. मला इथे खूप भीती वाटते.”
आजीने हळूच डोळे उघडले! ती ठिक आहे हे पाहून मला बरं वाटलं.
“चल घरी जाऊ!”
“अरे आपल्या सारख्या दिसणाऱ्या या दोघी कोण आहे?” आजी म्हणाली.
“नाही....!” आम्ही दोघीही एकाच वेळी बरोबर किंचाळलो! आमचा अपघात झाला आहे आणि आम्हाला इजा झालीये.
“आजी आपण दोघी मेलो का?”
“नाही ग आभा अजून आपला दोघींचा श्वास चालू आहे.”
“चल आजी! आपण मदत घेऊन येतो!”
“अग आपण आता कुणालाही हाक मारू शकत नाही..आपला आवाज कोणालाही ऐकू येणार नाही..!”
“आजी आता काय होणार!”
“असुदे जे झालं ते झालं.”
“काय! आजी काय बोलतेय!”
“अग मी अगदी मनापासून आनंदाने जगले! तुला ही लग्न करायचं नव्हतं! तु ही स्वतःच्या पायावर उभी होती. तु ही अगदी तुला हवं तस आयुष्य आनंदाने जगत होती! आता मरण आलं तरी काय हरकत?”
“अग आजी लग्न करायचं नाही म्हणजे जगणं संपलं का?”
“नाही गं मी म्हणते की.....पहा मी एकटी रहायचे, आपण दोघीही इथे आहोत. घरी असे कोणीही नाही जो आपली चौकशी करायला घराबाहेर येईल. जवळच्या कोकजे बाई लवकर झोपतात. आता आपण स्वर्गवासी झालो हे मान्य करायला हवं.”
“अग आजी मला अजून जगायचं आहे!”
“पाहू देवाच्या मनात काय आहे! सध्या आपण काहीच करू शकत नाही. अग मला काही गोष्टी करायच्या राहिल्या आहेत! चल आज आपल्या ला वेळ आहे आणि कुठेही जायचं किंवा यायचा बंधन नाही तर आपण सगळीकडे मनसोक्त फिरायला जाऊया.”
“अगं आजी! तु हे काय बोलतेय? मला अजून देवाघरी जाण्याची इच्छा नाही. थांब मी आईस्क्रीमवाल्या ला बोलवून आणते!”
“दादा! ओ दादा! जरा इकडे येता का?
“तो ऐकत का नाही माझं?”
“तुला सांगितल न आभा आता कुणालाही आपला आवाज ऐकू देणार नाही. तु माझ्याबरोबर येतेय का! नाही तर मी जातेय.”
“मी इथं एकटी राहून काय करू!”
“का बरं? तुला तुझ संपूर्ण उरलेलं आयुष्य एकट जगायचं होतं ना... आता एकट असण्याने काय फरक पडणार? आणि ही वेळ तु एकटी असताना आली नसती! हे कश्या वरून?”
“आजी ते मी जीवनपद्धती साठी म्हणत होते.... तुम्ही सगळे होता न माझ्या बरोबर!”
“तोच विचार करत होते आज तुझे आजोबा असते तर ही वेळ आपल्या वर आली नसती. अव्वल मी त्यांच्या बरोबर आधीच आईस्क्रीम खायला आले असते नंतर तु आली असती तरी ही आईस्क्रीम मी ऑनलाईन मागवलं असत! किंवा! ते आत्ता आपल्याला शोधायला तरी आले असते! असो! आता काय करणार जेव्हा पर्यंत या देहात श्वास आहे तो पर्यंत आपण अजून फिरून घेऊ.
मला तर एकदा कालकेच्य दर्शनासाठी जायचं आहे. तुझे आजोबा आणि मी पहिल्यांदा तिथेच भेटलो होतो. ते होते तेव्हा आम्ही दरवर्षी एखाद्या रात्री नक्कीच जायचो...हे गेल्यानंतर मी कधीच रात्री टेकडी वर गेले नाही. हिंमत नव्हती एकटीने जायची! दुसरं आज मी टेकडी वर चढून गेले तरी माझे गुडघे दुखणार नाही. तु नक्कीच एकटी गेली असती कारण तु लग्न न करायच ठरवल होतं ना.”
“तु काय सारखं मला लग्न नव्हतं करायचं! असा टोमणा मारते आहे! मी येवढ्या रात्री एकटी अजिबात बाहेर नसते पडले. मात्र आता मी तुझ्याबरोबरचं राहणार”
“तु देवीचे दर्शन घेतले का पहा इथं किती शांत वाटतं!”
“हो घेतले! काय सुंदर दृश्य आहे आजी! खरंच मी इथे न यायचा विचार करणं चुकीचे ठरले असते. देवीला आता एकचं विनंती दोघींना सुखरूप ठेव! आजी पहा आता रात्रीचे दोन वाजले ह्या बाई इथे एकट्या काय करत आहेत? अगं आजी त्यांनी न सांगताच मला सगळ कळल ती कोणातरी सुदेश नावाच्या मुलाबरोबर लग्न न करता राहायची. दहा वर्षांनंतर आता त्यांच बिनसलंय म्हणून इथे टेकडी वर आत्महत्या करायला आली आहे.”
“काळजी करू नको देवीआई सगळ्यांचे रक्षण करते. पहा त्या रखवालदाराने तिला अडवले. एखादं मुल असत हिला तर तिला अशी कुबुद्धि सुचली नसती.”
“आजी त्या बाई कमकुवत ठरल्या म्हणून सगळ्यांनी लग्न करायलाच पाहिजे अस नाही बर!”
“अग बाळा मी कोणालाही लग्न करायलाच पाहिजे अस म्हणत नाही! पण हल्ली जे चाललंय! ते ही बरोबर नाही ना? या शरीराच्या काही मागण्या आहेत ना?”
एका काळानंतर शरीर थकल्यावर......नंतर जोडीदार शोधायचा तो पैसा असल्याने तुमच्या बरोबर आला! नंतर नाही जमलं! तर काय? आयुष्य भर मेहनत करून म्हातारपण वृद्धाश्रम मध्ये घालवण्यात काय मजा आहे? हल्ली एकट राहणं तसं सोपं आहे! मोठ्या-मोठ्या इमारती मध्ये खूप सोयी असतात पण मुद्दामच कोणी तुमच्या वर पाळत ठेवून तुम्हाला फसवलं तर मग काय करणार? मुली आईवडील काही जन्मभर पुरत नाही तेवढाच प्रेम करणारा कोणीतरी भेटला तर काय हरकत आहे. आता तर आमच्यासारखा जुना काळ ही राहिला नाही. मुलंही समजुतदार असतात फार आनंदाने आणि मानाने बायकोला वागवतात... असो! आता कुठे तुझं लग्न होणार आहे चल आपण परत जाऊयात कारण माझी वेळ संपली तुला अजून किती वेळ एकटं रहावं लागणार हे मला माहीत नाही..”
“आजी थांब मला एकटीला सोडून जाऊ नको.... थांब आजी..... थांब!”
“आभा! ऐ आभा!....काय झालं? इथे आजी कुठे आहे....”
मी डोळे उघडले तर हे स्वप्न होत....देवीची कृपा की हे स्वप्नंच आहे.
“आभा आज प्रसाद तुला भेटायला येणार आहे ऑफिस मधून लवकर ये!”
“आई मी त्याला भेटते पण लगेच पुढच सुरू करू नकोस... आधी आम्हाला भेटून ठरवू देत आम्ही अनुरूप आहोत की नाही.”
आई आनंदाने माझ्या जवळ येऊन माझा चेहरा पाहत होती, “अरे व्वा! आज तु नकार दिला नाहीं! आता मी त्याला खरच फोन करते की तु संध्याकाळी घरी ये.”
“मला नंबर दे मी कॉल करते आम्ही बाहेर भेटू. आजीला आता इथेच आपल्या जवळ रहायला सांग! खूप झाल तिचं एकट राहण्याचं कौतुक. खरंतर कोणीच कधीच एकटं पडू नये.”
स्वप्नात ही नाही..... आभा परत हळूच पुटपुटली....
सौ. मीनल आनंद विद्वांस