• 07 September 2024

    भावविश्व

    माती चा बाप्पा

    0 113

     

     

       श्री गणपती उत्सवाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा....

     

     

     

               मातीचा बाप्पा

     

     मातीचा बाप्पा

    मातीची सृष्टी

    मातीत ॐकार नाद

    अहो!

    त्याच मातीचे आम्ही!

     

    मातीची माणसं

    माती मध्ये आमची दृष्टी

    दृष्टीचा हा खेळ..

    दृष्टीचा हा खेळ आम्ही खेळतो!

    पंचतत्वाचे.... पंचतत्वाचे हे बाहुले आम्हीच!

    असे म्हणत मिरवतो

     

    सुखात आनंदाने नांदतो

    दु:खालाही कुरवाळतो

    धन-संपत्ती, अहं दाखवतो

    माणसं जपणं काय! हे आम्ही कायमच विसरतो

    मातीचे आहोत आम्ही हे तर सहज विसरतो

     

     

    दरवर्षी हेच आठवून द्यायला

    बप्पा घरोघरी अवतरतात

    श्रीमंत-दीन हे अंतर विसरावं ही शिकवण देतात

    जगणं कसं फक्त आनंदमय असावं

    हे सुचवतात

    कारण

     मातीचे आहोत आम्ही हे आम्ही सहज विसरतो

     

    दहा दिवस बाप्पा बरोबर आम्ही आनंदाने नांदतो

    मोहमाया बंधनात....

    त्याला ही अडकवायचा गोड प्रयत्न करतो....

    पण बप्पा काही अडकत नाही

    वाजत गाजत येणारा बप्पा

    तेव्हढ्याच आनंदाने परततो

    मातीचे आहोत आम्ही हे तो सहजच स्मरण करवून देतो

    कारण.....

     

    मातीचा बाप्पा

     

    मातीची सृष्टी

     

    मातीत ॐकार नाद

     

    अहो!

     

    त्याच मातीचे आम्ही!

     

    सौ. मीनल आनंद विद्वांस


     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

          


    -->

    श्री गणपती उत्सवाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा....

    मातीचा बाप्पा

    मातीचा बाप्पा

    मातीची सृष्टी

    मातीत ॐकार नाद

    अहो!

    त्याच मातीचे आम्ही!

    मातीची माणसं

    माती मध्ये आमची दृष्टी

    दृष्टीचा हा खेळ..

    दृष्टीचा हा खेळ आम्ही खेळतो!

    पंचतत्वाचे.... पंचतत्वाचे हे बाहुले आम्हीच!

    असे म्हणत मिरवतो

    सुखात आनंदाने नांदतो

    दु:खालाही कुरवाळतो

    धन-संपत्ती, अहं दाखवतो

    माणसं जपणं काय! हे आम्ही कायमच विसरतो

    मातीचे आहोत आम्ही हे तर सहज विसरतो

    दरवर्षी हेच आठवून द्यायला

    बप्पा घरोघरी अवतरतात

    श्रीमंत-दीन हे अंतर विसरावं ही शिकवण देतात

    जगणं कसं फक्त आनंदमय असावं

    हे सुचवतात

    कारण

    मातीचे आहोत आम्ही हे आम्ही सहज विसरतो

    दहा दिवस बाप्पा बरोबर आम्ही आनंदाने नांदतो

    मोहमाया बंधनात....

    त्याला ही अडकवायचा गोड प्रयत्न करतो....

    पण बप्पा काही अडकत नाही

    वाजत गाजत येणारा बप्पा

    तेव्हढ्याच आनंदाने परततो

    मातीचे आहोत आम्ही हे तो सहजच स्मरण करवून देतो

    कारण.....

    मातीचा बाप्पा

    मातीची सृष्टी

    मातीत ॐकार नाद

    अहो!

    त्याच मातीचे आम्ही!

    सौ. मीनल आनंद विद्वांस




    मीनल विद्वांस


Your Rating
blank-star-rating
Sorry ! No Reviews found!