आपल्या आयुष्यात कोविड काळ कदाचित सर्वात कठीण काळ
असावा...कोविड काळात होणारा नुकसान कधीही भरून काढता
येणार नाही. कॉलोनीत दिसणारे, शहरात सहज भेटणारे, फक्त तोंडओळख असणारे पुष्कळ चेहरे पुन्हा कधीच
दिसले नाही.
खरंतर विषय येवढा
जुना आहे की आता कोविड काळ विसरायला झालं आहे, मात्र कधीतरी काही
आठवलं आणि पुन्हा जुन्या आठवणी ताज्या होतात आमच्या घरासमोरील बगीच्यात फिरायला
किंवा आपापल्या नातवंडांना फिरवायला पुष्कळ आजी-आजोबा यायचे(अजूनही
येतात). एक फार कडक शिस्तीच्या काकू नेहमी यायच्या बार्डर ची कॉटन ची साडी, कपाळावर कुंकू कानातले, मंगळसूत्र आणि चार सोन्याच्या बांगड्या. हे एका मराठमोळ्या बाईचं रुप आहे सहजच लक्षात
आलं असेल पण त्या बाईंच्या टोकदार नाक असलेल्या चेहऱ्यावरच्या विद्वत्तेचे तेज काही
केल्या विसरता येत नाही. त्या तेजस्वी काकू सहज
मला त्यांची ओळख व्हावी यासाठी प्रवृत्त करायचे. मात्र एकेदिवशी त्याचं
माझ्याशी बोलल्या माझी चौकशी केली आणि स्वतः ची माहिती ही सांगितली एका उत्तम
शिक्षिका अर्थातच मुलं परदेशात स्थायिक झालेले. येत्या महिन्यात
त्या मुलाजवळ जाणार आहे असं त्यांनी सांगितलं. नंतर त्याच्या
बरोबर कधी संवाद झाला नाही. कधी कधी हा प्रश्न
पडतो मला की कधीतरी कोणी खूप बोलतो नंतर अचानक ओळख न दाखवता कोणी कस राहु शकतोस. असो?
त्या जिथे असतील सुखरूप असाव्यात असंच सारखं
मनात येत असतं.
कोविड काळ आला आणि सगळ विस्कळीत झालं... अशी कधी न विसरता येणार व्यक्तिमत्त्व तुम्हाला
ही कधीतरी भेटले असावेत. म्हणून आज सहजच...आठवणीतील काही.....
सौ. मीनल आनंद विद्वांस